निलंगा/सुभाष नाईक :- निलंगा येथील भारतीय स्टेट बॅकेतील सीडीएमइ मशीनमध्ये २१ डिसेबंरला २०१९ रोजी उमेश नाईक यांनी आपल्या खात्यावर जमा केलेली रक्कम अद्याप त्यांच्या खात्यावर बॅकेने केली नसल्याचे समोर आले आहे.ही रक्कम तब्बल एक महिना झाला तरी जमा नसल्याने ग्राहक संताप करीत आहे.
भारतीय स्टेट बॅक ही देशात नावाजलेली बॅक म्हणून ओळखली जाते.या बॅकेत सीडीएमई मशीन मध्ये २१ डिसेंबर २०१९ रोजी उमेश नाईक यांच्या नावावर रक्कम २२ हजार ५०० व २ हजार रू.सायंकाळी निलंगा शाखेत जमा केले ही रक्कम कॅशिअर जगदाळे गैरहतर असल्यानी निलंगा शाखेत जमा झाले नाही म्हणून उमेश नाईक रोज बॅकेच्या चकरा मरत आहेत असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बेालताना सांगितले.यावर क्षेत्रीय अधिकारी काय कार्यवाही करतील योकडे ग्राहकांचे लक्ष लागलेले आहे.
भारतीय बॅकेत जमा केलेली रक्कम खात्यावर जमाच नाही;संताप व्यक्त