सिध्देश्वर ..

-हेमंत मुसरीफ पुणे

 

मिरवणूककाठ्यांची

सुखअमृतात न्हालो

डोळे दिले पहायला

मी धन्य धन्य झालो

 

शुभ्र पांढ-या गर्दीत

मिसळूनशुध्द झालो

जयघोष   हर्र हर्रचा

भान   हरपूनि  गेलो 

 

तीळ गूळ देता घेता

वैर अहंम्  विसरलो

लिंगा आलींग  देता 

मीमाझा कुठे उरलो