एक महिण्यात देवणी तालूक्यात पाच घरफोडया

वलांडीत भरदिवसा व देवणीत चोरीचे सूत्र सूरूच  एकटे घरात राहण्याची महिलांना भीती



देवणी/रणदिवे लक्ष्मण :- देवणी तालुक्यात अवैद्य धंद्याने थैमान घातले असुन देवणी तालुका सध्या गुन्हेगारी बाबतीत सगळ्या अवैद्य धंद्यात केली वाढ पो.नि. कामठेवाढ या अवैद्य धंद्यामुळे देवणी तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढली असल्याची  चर्चा आता तालुक्यात होताना दिसत आहे.
देवणी तालुक्यातील मौजे वलांडी येथील भरवस्तीत शुक्रवारी (ता. १७) भरदिवसा घरफोडी करीत चोरट्यांनी सोन्यासह रोख रक्कम लंपास केली असुन, एक लाख चोवीस हजार रुपयाची धाडसी चोरी झाली आहे. 
याबाबत माहिती अशी की, वलांडी येथील जुन्या पोलीस चौकीलगत शिवशंकर काशिनाथ महाजन यांचे घर आहे. शुक्रवारी (ता. १७) शिवशंकर महाजन व त्यांच्या पत्नी या गावी गेले होते. सांयकाळी पाच वाजता ते घरी परतल्यानंतर घराचे कुलुप काढल्यानंतर दरवाजा आतमधुन बंद असल्याने उघडत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नातलगासह शेजार्‍यांना सोबत घेत घरामागील बाजुन चढुन दरवाजा काढल्या त्यानंतर त्यांच्या घरातील सर्वच साहित्य अस्ताव्यस्त व विखरलेले होते. 
स्वयपाकघरातील तिखट मिठापासुन शेंगदाणे, शेंगदाण्याची चटणीपासुन पापड खारोड्यापर्यंत एकही डबा चोरट्यांनी न उघडता सोडला नाही. पहिल्या व दुसर्‍या माळ्यावरील दोन्ही कपाट फोडुन ठेवलेली प्रत्येक वस्तु चाचपुन बघत मौल्यवान वस्तुचा शोध घेतला घरात येणारे सर्वच दरवाजे आतुन बंद करुन चोरट्यांनी शिताफिने आपले काम साध्य केले आहे. 
वलांडीचा शुक्रवारचा आठवडी बाजाराची प्रचंड वर्दळ असते संक्रात्रीच्या हळदि कुंकवाल्या जाणर्‍या महिलांची मोठी वर्दळ असताना व भर वस्तीतील घर फोडत धाडसी चोरी झाल्याने गावात दहशत व घबराटीचे वातावरण पसरले आहे. फिर्यादी शिवशंकर काशिनाथ महाजन यांच्या फिर्याद वरुण सोने चांदी दागीने रोख रक्कम मिळुन एक लाख चोवीस हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याचे फिर्याद देवणी पोलीसात दाखल झाली असुन अज्ञात अरोपी विरोधात गु.र.न.१९/२० कलम ४५४,३८०,भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आसुन पुढील तपास पोउनि आर आर काथवटे हे करीत आहेत.