रेणापूर /प्रतिनिधी:तालुक्यातील दर्जीबोरगाव येथील जागृत देवस्थान श्री चिन्मयानंद स्वामी मठ येथे सांस्कृतिक सभागृह उभारण्याची घोषणा खा. सुधाकरराव शृंगारे यांनी केली .
दर्जीबोरगाव येथे चिन्मयानंद स्वामी समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित कथेस खा. सुधाकरराव शृंगारे यांनी भेट दिली . स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन कथा श्रवण केली . खा.शृंगारे यांनी यावेळी मंदिर परिसराची पाहणी करत भाविकांसाठी उपलब्ध सुविधांची माहितीही घेतली . रेल्वे बोर्डाचे सदस्य निजाम शेख यांनी स्वामी चिन्मयानंदांचा इतिहास तसेच दर्जी बोरगाव येथे आयोजित केल्या जाणार्या विविध उपक्रमांची माहिती त्यांना दिली . कथा श्रवण करण्यास उपस्थित जनसमुदाय पाहुन भक्तांना बसण्यासाठी सभागृह नसल्याचे खासदारांच्या लक्षात आले . खा. शृंगारे यांनी लगेचच मंदिर परिसरात सभागृह उभारण्याची घोषणा करत पुढील सोहळ्यापर्यंत त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले .
यावेळी मठ संस्थानाचे सचिव ड. संतराम चेवले , सुरेश कटके ,सरपंच सायास धावारे , उपसरपंच अंकुश लोणकर , सुंदरराव माने , विनायकराव ,माने , पाशुमियॉं शेख , बाबासाहेब माने , अमोल माने , बाळासाहेब सुरवसे , विजयकुमार रेडडी , धर्मराज कटके , विद्याधर कुलकर्णी , नामदेव शिंदे, अकुश गवळी, विलास रोंगे यांच्यासह पदाधिकारी आणि भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
चिन्मयानंद स्वामी मंदिरात सभागृह उभारण्याची खासदारांची घोषणा