शेतकर्‍यांनी पारंपारिक शेती सोडून आभ्यास पुर्ण शेतीकडे वळावे-अभिजीत पानसे

मोठ्या दिमाखात लातुर येथे कृषी नवनिर्माण २०२०  कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन



 लातुर :- शेतकर्‍यांनी पारंपारिक शेती न करता शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान वापरून आभ्यासपुर्ण शेतीकडे वळावे असे आवाहन सिने चित्रपट दिग्दर्शक तथा मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लातूर येथे आयोजित केलेल्या मकृषी नवनिर्माण २०२०फ कृषी प्रदर्शनाच्या थाटात पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित शेतकर्‍यांना केले.
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुसरे राज्य स्तरीय कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे.दि.२८जानेवारी २०२० ते १ फेब्रुवारी २०२० असे हे कृषी प्रदर्शन चालणार असुन आज मंगळवार दि.२८ रोजी या कृषी नवनिर्माण २०२० कृषी प्रदर्शनाचे मराठवाडयातुन  हजारोंच्या संख्येनी उपस्थित असलेल्या शेतकर्‍यांच्या उपस्थितीत मोठया थाटात प्रख्यात सिने दिग्दर्शक तथा मनसे नेते अभिजीत पानसे यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून पार पडले.यावेळी मनसे नेते अभिजीत पानसे, प्रदेश अध्यक्ष मनससे दिलीप बापू धोत्रे, प्रदेश अध्यक्ष शेतकरी सेना मनसे संतोष नागरगोजे,प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे,लातुर जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाने,सुमित खांबेकर,सुमंत धस, राजेंद्र गपाट, आदर्श शेतकरी नवनाथ कस्पटे आदि उपस्थित होते .यावेळी मराठवाडयातील अकरा प्रगतशील शेतकर्‍यांचा स्मृतीचिन्ह, शाल व फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.या वेळी पुढे बोलतांना पानसे म्हणाले कि,  मराठवाडयातील शेती ही थोडया फार पडणार्‍या नैसर्गिक पाऊसावर  अवलंबुन असल्यामुळे पिक आले आले म्हणतअसतांनाच त्यावर रोग किंवा किड पडते व त्याचे हातचे पिक जाते.शासनाकडून अमुदान,कर्जमुक्ती,कोरा सातबारा अशा मदतीच्या घोषणा केल्या जातात त्या शेतकर्‍यांपर्यंत खरंच किती पोहचतात हाच खरा संशोधनाचा विषय आहे. यामुळे शेतकरी आत्महत्ये कडे वळतो.तर नविन पिढी बापाचे जे झाले ते आपले होवु नये म्हणून शेती पासून दुर जात आहे.शेतकर्‍यांनी नव नविन तंत्रज्ञानाचा वापर करून अधुनिक शेतीकडे वळण्याची गरज आहे.
 तेव्हाच त्यांच्या उत्पादनात वाढ होईल. शेतीच्या नविन तंत्रज्ञाना बरोबरच त्यांनी आपले मत ही बदलण्याची गरज आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी सुखी व समाधानी होता म्हणुन राज ठाकरेंनी भगवा हाती घेतलाअसल्याचे सांगत मनसेच्या वतीने दरवर्षी मराठवाडा व विदर्भात कृषी प्रदर्शन घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.तर डॉ.नरसिंह भिकाने,अशोक तावरे ,दिलिप बापु धोत्रे यांनी ही उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.यावेळी अभिजत पानसे यांनी कृषिप्रदर्शनातील तीनशे स्टॉल्स ला भेट दीली.तसेच शेतकर्‍यांच्या सुमंत देशपांडे विद्यालनकार क्लासेस आणि सूरी सरांचे असेंट क्लासेस च्या तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत शिकवण्याचा आणि स्कॉलरशिप देण्याचा निर्णय संतोष नागरगोजे यांनी जाहीर केला.याच कार्यक्रमात हस्यकलाकार दीपक सूळ यांचाही सत्कार करण्यात आला.
 यावेळी मनसे शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी मराठवाडयातील लातुर येथे कृषी प्रदर्शन का घेतले याबद्दल सविस्तर उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.