सशक्त लोकशाहीसाठी प्रत्येक मतदार हा निवडणूक साक्षर झाला पाहिजे-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित मतदार जनजागृती रॅलीस मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद


लातूर :- भारतीय लोकशाही अधिक सशक्त व्हावी म्हणून प्रत्येक मतदार निवडणूक साक्षर झाला पाहिजे. याकरिता नव मतदारांनी अधिक सक्रियपणे निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यावा. तसेच कोणत्याही मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात आयोजित २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त मतदार जनजागृती रॅली समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे,
उपविभागीय अधिकारी सुनिल जाधव,
उपजिल्हाधिकारी (सामान्य ) प्रदिप कुलकर्णी , पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे, पोलीस उपअधिक्षक (गृह),श्री.हीरमुखे, तहसीलदार स्वप्नील पवार, नायब तहसीलदार (निवडणूक ), हरीश काळे, के. एम. बकवाड उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, आपणास प्रत्येक पाच वर्षाने प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. मतदार हा वय वर्षे १८ पूर्ण झालेला असला पाहीजे. यासाठी प्रत्येकानी आपल्या परिसरातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीचे मतदार यादीत नाव नोंदणी करण्यास प्रोत्साहन देवून मतदार नोंदणी करण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हयात मतदार जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या चित्रकला, रांगोळी व वाद विवाद स्पर्धेमध्ये प्रथम ,व्दितीय व तृतीय आलेल्या स्पर्धकांना व उत्कृष्ट कार्य करणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व पोलीस अधिक्षक राजेंद्र माने यांच्या हस्ते प्रमाण पत्र व पुष्प देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी मतदार दिना निमित्त उपस्थित मतदारांना लोकशाहीवर विश्वास ठेवण्याची शपथ देण्यात आली.