कधी कधी एखादं बाळ उच्चभ्रु घराण्यात किंवा अतिशय गलिच्छ वस्तीत जन्माला आलं म्हणून त्याच्या तुच्छ वागण्याकडं जाणूनबुजून डोळे झाक केली जाते. आणि त्याच्या वाचाळ, अविद्वत आणि फुशारकीच्या अवास्तव बोलण्याकडं दुर्लक्ष केलं जातय. पण महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या नावानं ब्रँडीग करुन, महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी अंबाबाईचा वापर करुन, मराठीच्या अस्मितेच्या नावानं सबंध महाराष्ट्रात जागरण गोंधळ घालून, हिंदूत्वाच्या मुद्यावर आपलं अस्तित्व निर्माण केलेल्या शिवसेनेच्या कवल्याखाली हाळजलेलं एका वाचाळ, बेलगाम, बिनव्हटाळीच्या गाढवासारखं पांदोपांदी चरत सुटलेलं, मोक्कार पोसलेलं डुक्कर अशा एक ना अनेक गलिच्छ उपाधींना पात्र असलेलं एक चरित्रहिन व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मनात द्वेषभावनेतून घर करताना दिसत आहे. महराष्ट्रातील राजकारणाला गलिच्छ आणि नालीतील किडीचा दर्जा प्राप्त करुन देणार्यांपैकी एक म्हणून समजल्या जाणार्यांपैकी खासदार संजय राऊतांना सध्या महाराष्ट्रात ङ्गऊतफ आल्याचं बोललं जात आहे. ग्रामीण भागातील म्हणीनुसार गुवात बुडवून दहा जोडे मारुन एक मोजावा असे एकूण शंभर जोडे मारले तरी याने शिवरायांच्या वारसांबद्दल आणि त्यांच्या खानदानाबद्दल व्यक्त केलेल्या शंकेच पातक फिटणार नाही. अशी ही बेमोसमी औलाद आज महाराष्ट्रासह देशात आपल्या वाचाळवाणीचं विष पेरत आहे. आणि त्याला सामनासारख्या बाळासाहेबांच्या मुखपत्राची सहूलत मिळत आहे ही खंत व्यक्त करणारी बाबच म्हणावी लागेल. याचे गंभीर परिणाम प्रत्यक्षात शिवसेनेला भागावे लागणार आहेत यात तिळमात्र शंकाच नाही. कारण इतिहास साक्षी आहे की, अनेक धिरोदत्तांना आपल्या घसरलेल्या वाणीमुळे अनेक उच्च पदे त्यागावी लागलेली आहेत हातर तुमच्या दारात पोसलेला भूंकम्हटलं ती अवास्तव आणि पिसाळलेल्या कुत्र्यासारखां भुकणारा कुत्रा महाराष्ट्राच्या सिंहासनाधिष्ट छत्रपती घरण्यावर भुंकतोय हे अतिशय दुर्दैवी म्हणावे लागेल. आहो ज्यांच्या नावानं आपनं आपल्या उगीवतीच्या काळात सकल महाराष्ट्रात परडी मागितली, त्यांच्या छत्रछायेत बाळासाहेब आणि सकल शिवसैनिकांनी शिवसेनेचं अस्तित्व निर्माण केलं आणि अशा द्वेष्ट्यावृत्तीच्या श्वानामुळं तुम्ही धुळीस मिळणार असाल तर तुमच्या अशा या हिन शेवटाला कोणीच आडवू शकणार नाही हे मात्र नक्की. तुमच्या खानदानाचा पत्ता नसताना तुम्हाला छत्रपतींच्या वंशाजांने पुरावे मागण्याचे धैर्य झालेच कसे. ज्यांच्या टुकड्यांवर तुम्ही आजपर्यंत तरला आहात त्यांच्यावर भुंकण्याचे परिणाम भलेही प्रत्यक्षात त्यांच्याकडून तुम्हाला नाही भोगावे लागले तर जनता तुम्हाला सोडणार नाही हे ध्यानात ठेवा. चार कुत्रे सोबतीला आले म्हणजे काय तुम्ही दिल्लीचं तख्त काबिज केल्याच्या अविर्भावात बेलगाम झालात. वक्तृत्वनिती ढासाळलेल्या राऊत यांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केलेल्या पुस्तकावरुन केलेली टिका तिथपर्यंत ठिक होतं. कारण, मोदी, गांधी, पवार यांच्याबद्दलचा आपला अनुभव पूर्वापार आहे पण राऊतांच्या वाणीला आलेल्या ऊताचा फेस चक्क छत्रपतींच्या वंशजावर केलेल्या टीकेनंतर बरबटलेला दिसून आला. त्याला प्रतिउत्तर देताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राऊताला सज्जड दम दिला खरा पण जनता त्याला माफ करणार नाही. भलेही शिवसेनेची दिशा भरकटलेली असेल, पण शिवरायांच पेटंट करुन त्यांचा कॉपिराईट फक्त आमच्याकडंच आहे आणि आम्ही त्यांच्याबद्दल काहिही उणे-उतर बोलू तो आमचा अधिकार आहे असा जर तुमचा समज असेल तर लक्षात ठेवा. शिवसेनेला आणि त्यांच्या चपल्यांच्या आणि जोड्यांच्या रांगेत वाढलेल्या राऊतालाही महाराष्ट्र आता त्यांची निसटलेली जागा दाखवेल हे मात्र नक्की. आम्ही छत्रपतींच्या राजघराण्यात जन्मलो याचे नेमके काय पुरावे द्यायचे? असा सवाल करत आम्ही राजघराण्यात जन्माला आलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असे म्हणत आ. शिवेंद्र राजे यांनी सोज्वळ उत्तर राऊताला नाही तर शिवसेनेला दिले असले तरी हा वाद त्यांनी सुरु केला आहे, आता तो संपवायचा कसा हे त्यांनीच बघावं, असंही शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद? का आजच्या संकरण झालेल्या आणखी कोणाची असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.
सत्तेसाठी इतकी यांनी लाचारी पत्करलीय की जनता यांच्यावर आता थुंकेल. ज्यांच्या रक्तातच गद्दारी आहे, तुघलकी वृत्तीतून गाजरगवतासारखं अवास्तव वाफलेलं हे गवत आता येत्या काळात मतदार साफ करायला विसरणार नाही. लोकसभेच्या निकालानंतरच सत्तास्थापनेच्या चर्चा सुरू केल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं राऊतांनी कबूल केलं होतं की शिवसेना एकटी लढली असती तर २५ जागा पण निवडून आल्या नसत्या. याची जाणीव त्यांना होती म्हणूनच भाजपसोबत युतीचं नाट्य करुन सकल महाराष्ट्राची दिशाभूल करुन राज्यात ५५ जागांची मजल मारली. जनसामान्यांत युतीच्या सरकार येणार अशी दिशाभूल करुन यांनी महाराष्ट्राबरोबर गद्दारी करत आणि आपल्या राजकिय अस्तित्वापासून भाऊ समजलेल्या भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. केवळ मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या देवासमान बापाच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्राला दिलेल्या वचनांना, त्यांच्या नितीमत्तेला, शिकवणींना केराची टोपली दाखवत पिढीजात विरोधकांचे जोडे उचलून, त्यांची थुंकी चाटल्यागत नितीभ्रष्टतेने मुख्यमंत्रीपद मिळवले. अशा या नितीभ्रष्ट मुख्यमंत्री विराजमान शिवसेनेच्या नेत्याला, (प्रमुख म्हणवून घ्यायचा त्यांनी आत्ता हक्क गमावलाय म्हणून) येणारा काळ धडा शिकवेल हे मात्र नक्की आणि याचं संपूर्ण श्रेय्य राऊतालाच जाईल हे तेवढच सत्य. छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागणारा संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची औलाद? का आणखी काही त्यांचं संकरण झालेलं आहे असा सवाल ही अन्य नेत्यांकडून केला जात आहे, आणि तो रास्तच आहे. जाणता राजाची बिरुदावली छत्रपतींनाच दिली जाते. दुसर्यांवर आक्षेप घेतांना इतरांचे आक्षेपही कबूल केले पाहिजेत. ही दुट्टपी भूमिका आहे. इतर नेत्यांना महाराजांची उपाधी दिली तर त्याचीही चर्चा होणारच. शिव म्हणजे महाराजांशी संबंधित आहे. त्यामुळे संकरण झालेल्या शिवसेनेच्या नावाबाबत आणि अस्तित्वावर ही शंका घेणारी उदयनराजेंची भूमिका अगदी योग्यच आहे असं आता महाराष्ट्राला ही वाटायला लागलय.
राऊतांना ऊत आलाय...