हास्यक्लब ..

-हेमंत मुसरीफ पुणे


हास्यक्लब  चालवतो 
मनसोक्त  मी हसवतो
हसण्याचे फायदे कसे
कितीजणांना पटवतो 


घरी येताचं  चिडीचूप
बायकोपुढे होतो हुप्प 
स्मितहास्य सुध्दानाही 
रहावे    लागते   गप्प 


लोकलचे  धक्के असे
हसणार  सांगा   कसे 
अवतार गबाळा  होई
आपलेचं   होते   हसे 


ऑफिसमध्ये बॉसपुढे
चेह-यावरचा  रंग उडे
हसताना दिसलो जर
ऐकवती   बोल  खडे


परत  येता  बाजारहाट 
खिशाला मोठाली चाट
रडवेला   होतो   चेहरा 
महागाई   लावते   वाट


घरी  मुले   अभ्यासात 
सौ दमली स्वयंपाकात
उदासपणे जातो झोपी
गुरफटुन  मी  संसारात