लातूर /प्रतिनिधी :मनपाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नाट्यगृहाचे नामांतर करण्याचा ठराव महापौरांनी घेतला . हा ठराव बेकायदेशीर असून त्याची कायदेशीर वैधता तपासून तो रद्द करावा, अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .
भाजपा महापालिकेत सत्तेत असताना दि ७ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नाट्यगृहास अटलबिहारी वाजपेयी यांचे आणि आतील दालनास नटवर्य श्रीराम गोजमगुंडे , ग. दि. माडजुळकर , पु. ल. देशपांडे, सुधीर फडके यांची नावे देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता . महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव नाट्यगृहास देण्यासाठी या ठरावाकडे दुर्लक्ष करत नाट्यगृहास नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव घेतला . सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर नसतानाही या विषयाला मंजुरी देण्यात आली . हा ठराव बेकायदेशीर असून त्याची कायदेशीर वैधता तपासावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे . हा ठराव रद्द करावा अशीही मागणी भाजपाने केली आहे . जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनावर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी , माजी महापौर सुरेश पवार ,माजी उपमहापौर देविदास काळे , नगरसेवक गुरुनाथ मगे , स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती , शैलेश स्वामी , अजित पाटील कव्हेकर , देवानंद साळुंके , अनंत गायकवाड , सौ .वर्षा कुलकर्णी ,सौ . शोभा पाटील , सौ .रागिनी यादव , तुकाराम गोरे , जोतीराम चिवडे , मीना भोसले , हेमंत जाधव , ललित तोष्णीवाल आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
नाट्यगृह नामांतराविरोधात भाजपाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन