- हेमंत मुसरीफ पुणे .
धडाडे उद्रेक सुरूंग
शुभ्र रंग झाला भंग
पिळवटले अंतरंग
किती स्वस्त रक्त रंग
दोषारोपात कारे दंग
आपसात घडे जंग
एकमेकां मारा शिंग
जग पाही सारे व्यंग
एक व्हा फूंका शिंग
देश प्रेम अशी झिंग
नक्षलवादी भयभीत
पळून लावा जंग जंग