विद्रोह्यांची तोंडं ठेचली पाहिजेत

 भारतात राहून भारतातील सरकारांविरोधात आणि देशांतर्गत कलह निर्माण करणार्यांच्या विरोधात भविष्यात कठोर भूमिका घेणं अनिवार्य आहे. आजपर्यंतच्या म्हणजेच मागच्या दोन टर्मच्या सोडले तर पूर्वीच्या सरकारांनी केवळ त्यांची मतपेटी सांभाळण्यासाठी अशा शक्तींना पाठिशी घालत त्यांचे लाड पुरवून प्रत्यक्षात आपल्या राजकिय स्वार्थाची पोळी भाजून घेतल्याचे चित्र अनेकवेळा समोर आल्याने देशाने त्यांना झुगारून मोदी नेतृत्वाला स्विकारले. जनेतेने स्विकारलेल्या नेतृत्वाला सार्थकपणे प्रतिसाद देत मोदींनी ही सापेक्ष प्रतिसाद देत देशातील अनेक विकास कामे मार्गी लावलेली आपण अनुभवतोय. त्याशिवाय मागच्या ७० वर्षांपासून असलेल्या अनेक प्रलंबित प्रश्‍नांना सोडवून जनमनात आपली जागा निर्माण केलेल्या भाजपा सरकारने नुकतेच प्रभावी असलेले आणि देशातील सर्व अल्पसंख्यांक तसेच शेजारी राष्ट्रांत उपरोधिक वागणूक मिळत असलेल्या हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांकाना न्याय मिळावा या उद्देशाने सीएए म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहात पास केला. परंतू यामुळे देशातील विघातक शक्तींना जणू मिरचूच लागलेले दिसून येत आहे. कारण त्यांच्याकडून शेजार राष्ट्रांतून खासकरुन पाकिस्तानातून होणार्या दहशतवादी कार्यवाया आणि देश विघातक बाबींना थारा मिळणार नसल्याने त्यांचे धाबे दणाणले. त्याशिवाय देशात लोकसंख्येने दुसर्या क्रमांकावर असलेल्या परंतू अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असलेल्या मुस्लिमांना शेजार राष्ट्रांतून नागरिकत्व देण्यावरून या कायद्यात केलेल्या कठोर तरतुदींमुळे या समाजात खासकरुन केवळ मतपेटीचे राजकारण करणार्यांना आणि या समाजाच्या विद्रोही वृत्तीला पाठीशी घालून देशहीताचे नव्हे तर देशविघातक आणि केवळ स्वार्थाचे राजकारण करणार्या शक्तींना याची मोठी झळ पोहचलेली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये केवळ मुस्लिम समाजाला टार्गेट केलेले नसतानाही त्यावर राजकारण करण्यासाठी त्यांना उसकवुन त्याचा राजकिय लाभ घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या विघातक प्रयत्नांच्या पराकाष्टा सकल देशाने पाहिल्या आहेत. असे असताना सुध्दा देशात अनेक गटांकडून त्या शिवाय हिंदू राष्ट्रामध्ये केवळ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी वयाच्या ४०-४५ वर्षांपर्यंत फूकट शिक्षणा बरोबरच जवाहरलाल नेहरु विद्यापिठात शिक्षण घेणार्या गुंड आणि विद्रोही वृत्तीच्या अनेक भाडखाऊंचा वावर अनेक वेळा माध्यमांनी उघड करुन दाखवला होता. असे असताना सुध्दा त्यांना राष्ट्रभक्तांचा आणि राष्ट्राच्या भविष्याचा म्हणजे भावी पिढीचा दर्जा देऊन त्यांचे पालन पोषण करण्याच्या उद्देशाने त्यांना पाठमोरे घालणार्या देशातील शक्तींना तोंडावर पाडणारी घटना आज घडली. ती म्हणजे भारताचे तुकडे करण्याची भाषा करणार्या शरजील इमामला अखेर बेड्या घालण्यात आल्या. अशा या एकाच नाही तर अन्य अनेक अशा वृत्तींच्या गुंडांना आळा घालणे गरजेचे आहे.  शरजील इमाम संदर्भात अनेक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. परंतु अलिगढ मुस्लीम विद्यापीठात आसामला भारतापासून वेगळं करण्याचं प्रक्षोभक भाषण केल्यानंतर शरजील इमाम चर्चेत आला होता. भारताचे तुकडे करण्यासारखं वादग्रस्त आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ म्हणजेच जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला अखेर अटक करण्यात आली. बिहारच्या जहानाबादमध्ये दिल्ली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. शरजील इमाम हा दिल्लीतील शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या मुस्लीम महिलांच्या आंदोलनाचा सूत्रधार असल्याचं म्हटलं जात आहे. मुस्लीम महिलांच्या आंदोलनाचा सूत्रधार महिलांना आणि लहान मुलांना पुढे करुन केवळ शाहीनबागमध्येच नाही तर त्यांच्या अन्य अनुयायांच्या माध्यमातून देशातील अनेक भागांत आंदोलने घडवुन आणत होता. त्यानंतर त्यांच्याच गटातील गुंडवृत्तीच्या लोकांकडून बाजारपेठा बंदपाडून दहशत माजविणे, आपले अस्तित्वा दाखवून सरकारवर वा स्थानिक प्रशासनावर दबाव निर्माण करुन देशात मंजूर झालेला कायदा मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याची कुटनिती शरजील इमामकडून केले जात होते. अलिगढ मुस्लीम विद्यापीठात आसामला भारतापासून वेगळं करण्याचं प्रक्षोभक भाषण केल्यानंतर शरजील इमाम चर्चेत आला होता. याआधी पोलिसांनी त्याच्या भावालाही ताब्यात घेतलं होतं. या भाषणानंतर शरजील इमामवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यानंतर तो पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथकं तयार केली होती, ज्यांनी मुंबई, दिल्ली, पाटण्याच्या अनेक ठिकाणी छापा टाकला होता. अशा या इमामांकडूनच देशात मुस्लिम समाजातील नागरिकांना विद्रोही वृत्तीस प्रवृत्त करुन भडकाऊ भाषणांच्या माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. अशा या शरजील इमाम संदर्भात अनेक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. जो व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल झाला आहे, त्यात पूर्वोत्तर राज्य, विशेषता: आसामला उर्वरित भारतापासून वेगळं (कमीत कमी एका महिन्यासाठी) करण्याचा उल्लेख आहे. या भाषणानंतर शरजील इमाम पसार झाला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध राज्यांमध्ये छापासत्र सुरु केलं होतं. शरजील इमामविरोधात दिल्ली पोलिसांनी भादविच्या कलम १२४ अ, १५३ अ आणि ५०५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली होती. शिवाय अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील एका भाषणाप्रकरणी शनिवारी (२५ जानेवारी) देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. आसाम पोलिसांनीही शरजीलच्या भाषणासंदर्भात त्याच्याविरोधात दहशतवाद विरोधी कायदा यूएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. यापुढेही त्याला पोलीसांच्या ताब्यात ठेवून त्याच्या मागील गुन्हेगार पार्श्‍वभूमीची तपासणी करुन त्यावर कठोर कारवाई करुन देशद्राहाचा गुन्हा नोदविण्यात येणार आहे. याचाच अर्थ शरजील इमाम सारख्या विद्रोह्यांची तोंडं ठेचली पाहिजेत याची जाणव सध्याच्या सरकारला झाली हे महत्वाचे आहे.