कर्तव्य..

हा प्रजासत्ताक दिन 
झाला  आनंदे संपन्न 
हुत्साहे भिजले  सारे
जातभाषा जरी भिन्न


उत्सव उत्साह सरता
कामी रोजच्या  धन्य 
वेळ आता ना आम्हां
झेंडे पडे छिन्नविचीन्न 
 
अस्वच्छता   इतस्तत 
मन होई  अती  खिन्न
सफाई  मोहीम  करू
भारत माता हो प्रसन्न