तिरंगा
-रामकृष्ण पांडुरंग पाटील

 

स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

देण्यास सलामी झेंड्याला..!

तिरंगा आमचा अभिमान

भारतवर्ष करी वंदन त्याला..!!

 

शहीद शूरवीरांनी सांडले

रक्त या पावनभूमीवर..! 

म्हणून किरणं स्वातंत्र्याची

पडली आपल्या धरतीवर..!!

 

सैनिक माझा सीमेवरती

भारतमातेच्या रक्षणास..!

बांधून माथी कफन तो

तयार दुश्मनाशी लढण्यास..!!

 

स्वातंत्र्यासाठी आहुती देत

सेना शेवटपर्यन्त लढली..!

म्हणून आपली आज ही

स्वातंत्र्याची पहाट उगवली..!!