मांजराच्या धरनावर वाळुमाफियाचा डल्ला....!

मांजरेच्या वाळुला उस्मानाबाद जिल्ह्यात चांगला भाव



देवणी/प्रतिनिधी ः महाराष्ट्रात गौणखनिज प्रकरणे गाजत आहेत.विधानसभेतही या विषयावर तांराकिंत प्रश्न उपस्थित होत असले तरी मांजरा नदीतुन अवैद्य वाळु उपसा प्रकार अलबेल आहे.या प्रकाराला रोखण्यासाठी यांचा पुसता धनी कोण अशी चर्चा या भागात होत आहे.गौण खनिज विभाग ,पोलिस प्रशासन व स्थानिकचे पुढारी यांची जणु मिलीभगत झाल्याने वाळुचा प्रचंड उपसा आता प्रशासनालाही रोखणे जिकरीचे झाले आहे.
मांजरा पट्ट्यातील जवळगा ,हिसामनगर ,शिवुर ,टाकळी (व),कर्नाटक भागातील माळगुडरी जवळ निलंगा तालुक्यातील वाहने पहाता वाळुचा धंदा चांगलाच तेजीत आहे.
या भागात वाळुचे टेंडर झाले नसतानाही वर्षभर हा व्यवसाय बिनदिक्कत चालु आहे.आवैद्य वाळु साठा करायचा...प्रशासनाकडुन तो जप्त करुन जुजबी लिलाव करुन पावत्या द्यायच्या अन् त्या पावत्यावर व थोडाफार मंथली देवुन बिनबोभाट धंदा हा वाळुमाफियाचा फार्म्युला चालतोय..अडगळीच्या माळगुंडरीकडे सर्वात जास्त ट्रक्टर चालतायत .शिवाय ट्रक्टरने साठा करायचा अन् हायवा भरुन निलंगा मार्गे उस्मानाबाद जिल्ह्यात ५० हजाराला टिप्पर असा भाव आहे.तहसिलदारावर जीवघेणा हल्ला करुनही या धंद्याकडे प्रशासनाचा कानाडोळा असणे हा संशोधनाचा विषय आहे.देवणी व निलंगा तालुक्यात या धंदेवाल्याचे जणु संघटनच झाले आहे.एकाने हप्ते वसुल करुन देण्याची जबाबदारी घेतल्याची ऐकिवात आहे.इतकेच नव्हे तर वेळेवर हप्ता नाही आला तर वाहन पकडणे व सव्वा लाखाच्या दंडाची भिती दाखवुन हजारावर तडजोड ही नित्याचीच बाब बनली आहे.दररोज वाहन पकडल्याच्या घटना कानावर येतात पण कारवाई झाल्याचे दप्तरात नोंदच नाही यावरुन सर्वकाही अलबेल आहे.
वाळु विक्रेते वाढल्यामुळे , स्थानिक पातळीवर वाळु पुरवठा करण्याची चढाओढ लागली असुन यातुन आता एकमेकांच्या विरोधात चाड्याचुगल्याही डोके वर काढत आहेत.यात तहसील ,पोलिसवाले हात धुवुन घेत असले तरी शासनाच्या गौणखनिजची मात्र पुर्ती वाट लागते हे कोणीही नाकारु शकत नाही.जिल्हा पातळीवरील गौणखनिज अधिकारी लक्ष देतील का ?अशी मागणीही आता जोर धरत आहे.