- हेमंत मुसरीफ पुणे.
सण हळदी कुंकवाचे
निमित्त एकत्र येण्याचे
विचार विनीमय करतां
तिळगुळ देण्याघेण्याचे
घर छान सजवण्याचे
पदार्थ नवीन खाण्याचे
दिस स्वतः सावरण्याचे
कार्यक्रम करा गाण्याचे
सण जरी सुवासिनीचा
कारण ना दुखवण्याचे
उगाचं कुणी स्तोम करी
इलाज ना या दुखण्याचे