अल्पवयीन मुलींवर अमानुष अतिप्रसंग करणार्या नराधमास कठोर कार्यवाही करण्यासाठी लसाकम, शाखा अहमदपुरच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन


अहमदपूर (उदय गुंडीले)ः अल्पयीन शाळकरी मुलींवर शाळेतील शिक्षकांनिच अमानुष अतिप्रसंग केल्या प्रकरणी कठोर कार्यवाही करुन मुलीचे पुर्नवसन करणेसाठी तहसीलदार तहसील कार्यालय, अहमदपूरच्या वतीने मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे. 
 निवेदनात म्हटले आहे की, शंकर नगर तालुका बिलोली येथील साईबाबा विद्यालयात इयत्ता सहावी वर्गात शिक्षण घेत असणार्या मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर याच शाळेतील शिक्षक सय्यद रसुल व राजुळे या शिक्षकांनी मागिल दोन तीन महिण्यापासून तिचा मानसिक छळ करुन तिचे नग्न अवस्थेतील फोटो व चित्र दाखवुन तसेच धमक्या देवून तिच्यावर अनेकदा अमानुष अत्याचार केला दिनांक १७.१२.२०१९ रोजी या मुलीवर शेवटचा अतिप्रसंग अतिशय निर्दयीपणे व अमानुषपणे केला गेला.  ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली व तीला मानसिक धक्का बसुन ती एका बाजुन अर्धांगवायुच्या धक्याने अपंग झाली आहे.  
 सदरील मुलीची आई विधवा असुन त्या घटनेनंतर पिडीत मुलीस अर्धबेशुद्ध अवस्थेत तिच्या घरी आणुन सोडण्यात आले.  या घटनेनंतर मुलीच्या आईने शाळा प्रशासनाला याबाबतील जाब विचारला असता शाळेतील दोन शिक्षक व प्रदिप पाटील यांनी सदरील महिलेस माझी खासदार असलेल्या संस्थाचालकाच्या घरी नेवून तिच्यावर दबाव टाकुन तिला व तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देवुन सदरील मुलीला नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.  व मागील एक महिण्यापासून या रुग्णालयात त्या मुलीवर पोलिस यंत्रणेला सुचना न देता वैद्यकिय उपचार होत आहे दरम्यान आरोपीचे व शाळा प्रशासनाचे अनेक पदाधिकारी येवून या महिलेला सदरील बाब इतर कोणालाही सांगु नको म्हणून दबाव टाकला जात होता.  ही घटना परवा कांही सामाजिक कार्यकर्त्याला समजल्याने व सामाजिक कार्यकर्त्यांच्या न्यायाच्या मागणीवरुन पोलिस प्रशासन हरकतीत आले आहे.  सदरील घटना माणुसकीला काळीमा लावणारी असुन शिक्षकी पेशाला एकुणच शिक्षण क्षेत्राला बदनाम करणार्या या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करुन शाळा प्रशासनातील व संस्थेतील जबाबदार व्यक्तिवर कार्यवाही करावी. आरोपींना कडक शासन व्हावे सदरील कुटुंबाला कुठलेही आर्थिक साधन नसल्यामुळे या कुटुंबाची आर्थिक बाजु खूप नाजुक असल्याने तात्काळ पीडित मुलीला आर्थिक मदत देण्यात यावी, सदरील कुटुंबाचे पुर्नवसन करण्यात यावे व पिडीत मुलीच्या आईस उदरनिर्वाह साठी शासकीय सेवेत समावुन घेण्यात यावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे.