मोठा गैरव्यवहार झाल्याची चर्चा;ठेविदार,खातेदारात घबराट
देवणी/प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील मौजे तळेगाव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा असून या शाखेत असलेले शाखा व्यवस्थापक यानी गैरव्यवहार केल्या प्रकरणी त्याची चौकशी सुरू झाली असून या चौकशीत शाखेत नुकसान भरपाई रखडली आहे.
परतीच्य पावसाने शेतीचे नुकसान झाले.शासनाकडुन आलेली नुकसान भरपाईची रक्कम बँकेच्या खात्यात जमा झाली.पण बँकेच्या शाखाव्यस्थापकाने अफरातफर केल्याच्या कथित प्रकरणावरुन सद्यस्थितीला नुकसान भरपाई वाटपाची प्रक्रिया रखडली आहे.याप्रकारामुळे बँकेच्या ग्राहकातुन संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की ,देवणी तालुक्यातील तळेगाव (भो)येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा असुन या शाखेअंतर्गत तळेगाव ,अचवला ,पंढरपूर ,गुरधाळ ,खरबवाडी ,पेठेवाडी ,नागतीर्थवाडी ,चवणहिप्परगा ,सय्यदपुर या गावचा व शेतकर्यांचा व्यवहार तळेगाव शाखेशी आहे.तर झालेल्या गैरव्यवहारामुळे ठेविदार,व खातेदार यांचे धाबे दनानले असून पैसे मीळणार की नाही या संभ्रमात संबंधित शाखेतील शेतकरी आसल्याचे चीत्र दीसत असून त्यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
नुकतेच परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई बँकेत जमा झाली आहे.ही रक्कम शेतकरी उचलण्याच्या तयारीत असताना या बँकेचे शाखाव्यस्थापक यांनी बँकेच्या रक्कमेत अफरातफर केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याची चर्चा ऐकिवात आहे.या प्रकाराला बँकेचे संचालकानी दुजोरा दिला .पण बँकेचे एम डी.यांच्याशी सदर प्रतिनिधीने संपर्क साधला असता हा प्रकार तुम्हाला कसा कळाला ?असा सवाल करत चौकशी सुरु असल्याचे सांगत याबाबत भाष्य करणे टाळले.सदर प्रकरणामुळे तळेगाव बँकेचे बहुतांश व्यवहार तात्पुरते ठप्प झाले आहेत.२०१५ पासुनची आर्थिक चौकशी सुरु असल्याचीही विश्वसनीय माहिती असुन याबाबत मोठा गैरव्यवहार झाल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.
मात्र शेतकर्यांचे नुकसान भरपाईचे अनुदान रखडले आहे.त्यामुळे शेतकर्यांतुन नाराजी व्यक्त होत आहे.जिल्हा बँकेचूया शाखा आँनलाईन झाल्या असताना पारदर्शक कारभार चालविणा-या बँकेत अपार्दशकता कशी ?अफरातफरीची रक्कमही मोठी असल्याची चर्चा होत असून याचे मोटे रॅकेट असल्याची चर्चा होताना दीसत आहे.तुर्तास नुकसान भरपाईची रक्कम काढण्यासाठी गेलेले शेतकरी घडल्या प्रकाराची माहिती ऐकुन तोंडात बोट घालुन नाविलाजाने परतत आहेत .आता आपली रक्कम कधी व कशी मिळेल अशी चर्चाही शेतकर्यांतुन होत आहे.