लातूर/प्रतिनिधी :- लातूरात निवडणूका लागल्या की किंवा राजकारण म्हटले की पाण्याचा विषय निघल्याशिवाय राहत नाही.लातूरात राजकारण करायचे म्हटले तर लातूररात पाण्याचा मुद्दा घेतल्याशिवाय सभा किंवा चर्चा होऊच शकत नाही.कारण लातूरकरांनी ऐके काळी सांगली-मिरज वरून रेल्वेने पाणी आणून तहान भागवली होती.लातूर शहरात पाण्याची त्रीव तंटाई असून पुढील काळात लातूरकरांची तहान भागवयाची असेल तर उजनीच्या पाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही.प्रत्येक वर्षी लातूरकरांना पाणीटंचाई पाचवीलाच पुंजलेली आहे.या वर्षी मात्र परतीच्या पावसाने कृपादृष्टी दाखवलेल्याने काही प्रमाणात का होईना लातूरकरंाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे.पंरतु येणार्या काळात पुन्हा लातूरकरांना पाण्यासाठी भटकंती करावीच लागणार आहे. उजनीच्या पाण्याबाबत मंत्री अमित देशमुख राज्यपाणी पुरवठा मंत्री संजय बनसोडे या दोन्ही नेत्यानी अगदी सावध भूमिका घेतली असून दोन्हीनेते उजनीच्या पाण्याबाबत अग्रही असून सरकारकडे या पाण्याबाबत पाठपुरावा करत असल्याचे दिसत असले तरी या पाण्याबाबत फक्त जुगलबंदीच होत आहे.पुढे उजनीचे पाणी लातूरला आले तर या पाण्याचा संपूर्ण भार लातूर महापालिकेवर पडणार असल्याने आदीच आदीच कंबरडे मोडलेल्या महापालिकेला या पाण्याचा भार सोसणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
लातूर आणि पाणी हे समीकरण संपूर्ण देशाला परिचित आहे.तसा लातूर पॅटर्न म्हणून लातूरचे नाव संपूर्ण देशात गेले तसेच लातूरात पाणी नाही लातूरकर रेल्वेने पाणी आणून पितात ही चर्चा संपूर्ण देशभर झालेली आहे.यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने अनेक प्रयत्न केले मात्र पाऊसच न पडल्यामुळे प्रशासनाला लातूरकरांना पाणी पाजणे शक्य झालेले नाही.लातूरात निवडणूका केवळ पाण्याच्या मुद्यावर पार पाडल्या जातात ती निवडणूक कोणतीही असून निवडणूकीत उजनीच्या पाण्याचा विषय निघतोच त्यामुळे राजकीय नेते पाण्याचा मुद्यंाचा आपल्या सोयीनूसार वापर करून घेतात.मागील काही महिन्यापूर्वी राज्यसभेच्या निवडणूका पार पडल्या या निवडणूकीतही सर्वच राजकीय पक्षानी उजनीच्या पाण्याचा मुद्दा निवडणूकीत प्रतिठेचा केलेला होता.
दरम्यान राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुुळे लातूर जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळालेली आहेत.त्यामुळे लातूरकरांच्या उजनीच्या पाण्याविषयी आशा उंचावलेल्या आहेत.मागील आठवड्यात कॅबिनेट तथा पालकमंत्री अमित देशमुख राज्यमंत्री संजय बनसोडे यंाच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदाराचा लातूरकरांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळीही व्यासपीठावर दोन्ही मंत्र्यानी उजनीच्या पाण्याबद्दल भाष्य केले होते.दरम्याणच्या काळात उजनीच्या पाण्याचा अवहाला राज्यसरकारला सादर करण्याच्या सूचना पालंकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.त्यामुळे याला मंजूरीतर मिळेलच पंरतु मंजुरी मिळाल्या नंतर या पाण्याचे पैसे महापालिकेच्या उरावर बसणार आहेत.त्यातच हे पाणी लातूरपर्यंत आण्यासाठी विजेच्या बिलाचा बोजा महापालिकेवरच बसणार आहे.आदीच कंबरडे मोडलेली महापालिका एवढा मोठा भार सोसणार कसा असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
परतीच्या पावसाने लातूरकरांवर थोडीफार का होईना कृपादृष्टी दाखवलेली आहे.सद्यातरी शहराला १२ दिवसाला मांजरा धरणातून पाणी पूरवठा केला जात आहे.या पाण्यासाठी विजेचे बील महिन्याला २० ते २५ लाख रूपये मनपा भरत आहे.मनपाकडे महावितरणचे पूर्वीचे १८ कोटीचे वीज बील थकीत आहे.त्यामुळे मागील महिन्यात महावितरणने मांजराच्या पाण्याचा वीजपूरवठा खंडीत केला होता.परंतु चाणक्क्ष महापौरांनी यावर तोडगा काढून वीजपूरवठा सुरळीत केलेला आहे.पुढे लातूरकरांना उजनीधरणातून पाणी पूरवठा केला तर याचे वीज बील किती कोटीवर येईल याचा अंदाज आतातरी काढता येणे शक्य नाही मनपाकडे महिन्याला कर्मचार्यांच्या पगारी करण्यापूर्तीही बजेट नाही.त्यामुळे कर्मचारी सततच संपाचे हत्यार बाहेर काढत असल्याचे लातूर महापालिकेचे चित्र आहे.त्यात लातूरात उजनीचे पाणी आले तर लातूर महानगरपालिका एवढा मोठा भार सोसेल का याची चर्चा न केलेलीच बरी.
लातूरकरांचे उजनीच्या पाण्याचं स्वप्न पूर्ण होईल का उन् मनपाला पाण्याचा भार सोसेल का?