लातूर (प्रतिनिधी):- शहरातील दयाराम रोड परिसरात राहणारे बापूराव विठ्ठल मुंडे ( वय ७०वर्ष )हे मागील चार दिवसांपासून बेपत्ता असून यासंदर्भात गांधी चौक पोलीस ठाण्यात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. बापूराव मुंडे हे शुक्रवार पासून बेपत्ता आहेत . कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला परंतु अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही . यासंदर्भात त्यांचा मुलगा गोविंद मुंडे यांनी गांधीचौक पोलीस ठाण्यात हरवल्याची फिर्याद दिलेली आहे . यासंदर्भात काही माहिती मिळाल्यास पोलीस ठाणे अथवा कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे .
बापूराव मुंडे चार दिवसांपासून बेपत्ता