लातूर/प्रतिनिधी :-लोकनेते विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री असताना जे नवं ते लातूरला प्रथम हवं याप्रमाणे लातूरचा विकास मोठ्या भरभराटीने केलेला होता.त्यातच त्यांनी लातूरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करून सुरूवातही केलेलही होती.या वैद्यकीय महाविद्यालयामुळे लातूरसह अनेकांनी या महाविद्यालयात प्रवेश घेवून आपलं डॉक्टर होण्याच स्वप्नं साकार केलेल होत दरम्यानच्या काळात विलासराव देशमुख कैलासवाशी झाल्याने लातूरचा विकास खूटला आहे.परंतु त्यांनी जे जे लातूरसाठी केले आहे त्यांची आठवण रहावी.यासाठी त्यांनी केलेल्या चांगल्या संस्था किंवा वैद्यकीय महाविद्यालयास लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी लातूर ग्रामीणचे तत्कालीन आ.त्र्यिबंक भिसे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती.त्याप्रमाणे सद्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मागणीच्या प्रस्तावास मान्यता दिली असून आता लातूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लोकनेते विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय असे नाव देण्यात येणार आहे.आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याने लातूरच्या या वैद्यकीय महाविद्यालचे नाव आता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर असे होणार आहे.
लातूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले लोकनेते विलासराव देशमुख महाविद्यालय