मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मालमत्ता कर भरा आम्ही २१ टकके मालमत्ता करात कपात करण्याचे आश्‍वासन पाळले -महापौर गोजमगुंडे

 


लातूर (प्रतिनिधी):-सन २०१९ मध्ये आ.अमित देशमुख यांच्या नेतृत्वात व्यापार्यांची मोर्चा काढून आम्ही मालमत्ता करात कपात करण्याची मागणी केली होती,ती मागणी सत्ताधार्यांनी मान्य केली नाही,तथापि आमची लातूर शहर मनपा आणि राज्यात सत्ता आल्यामुळे मालमत्ता करात तब्बल २१ टक्के कपात करुन आश्‍वासन पाळले असल्याचे सांगून मनपाची आर्थिक स्थिती  सुधारण्यासाठी मालमत्ता व गाळेधारकांनी आता थकबाकीसह, चालू वर्षाचा मालमत्ता कर भरुन मनपाला सहकार्य करावे असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
महापौर गोजमगुंडे यांनी सांगितले की, मागच्या काही वर्षात लातूर शहर मनपाची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली आहे.भाजपाची सत्ता आल्यानंतर तर १४ ते १५ टक्के निच्चांकी मालमत्ता कराची वसुली झाली.मागच्या अडीच वर्षांचा काळ तर अतिशय खराब गेला. गतवर्षी सत्ताधारी भाजपाने मालमत्ता करात भरमसाठ वाढ केल्याने नागरिकांनी तो भरण्यात रस दाखविला नाही.नाराजी वाढत गेली, मनपाची  आर्थिक स्थिती घसरत गेली.२० फेबु्रवारी २०१९ रोजी आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरच्या व्यापार्यासह मालमत्ताधारकांनी मनपावर मोर्चा काढून मालमत्ता करात कपात करण्याची मागणी केली होती. ती सत्ताधार्यांनी मान्य केली नाही,आता कॉंगे्रस पक्षाची राज्यात आणि लातूर मनपात सत्ता आल्याने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आदेशाने,जनतेची मागणी लक्षात घेवून ,मनपाचा गाडा चालावा,विकास साधावा म्हणून आम्ही नुकत्याच झालेल्या जी.बी. मध्ये ३१ मार्च २०२० पर्यंत कर भरणार्यांना १२ टक्के मालमत्ता कर कपातीबरोबरच ९ टक्के व्याज पूर्ण माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेवू मालमत्ताधारकांना दिलासा दिला आहे.या दोन्ही निर्णयामुळे मनपाला ९ कोटी ६३ लाखांची झळ सहन करावी लागणार  असून, त्याची अंमलबजावणी दि.२४ फेबु्रवारी २०२० पासून होणार आहे. आमच्या या दोन्ही निर्णयाबद्दल सुप्रीम कोर्टात से दाखल केला जाणार आहे.यातून मालमत्ताधारकांना दिलासा मिळणार आहे,त्यामुळे मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकीत आणि चालू  मालमत्ता कराचा भरणा तातडीने करुन सहकार्य करावे असे आवाहन केले.
लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यात वीज पुरवठा खंडीत आहे,वीज मंडळाला सोमवारी किमान ४ कोटी रुपये देण्याचा प्रयत्न असून,त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल, मागच्या मालमत्तांच्या सर्वेक्षणात मालमत्ताधारकाचे,भोगवटधारकांचे नाव,पत्ता,दिशा,आकार आदीमध्ये झालेल्या त्रुटीमध्ये दुरुस्ती करण्यासाठीचा कक्ष सुुरु करण्यात  येणार आहे. सन २०१६,२०१७ ची पाणी पट्टी माफ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आर्थिक संकटात आपलेल्या लातूर शहर मनपा महाराष्ट्र शिक्षण करापोटी दरवर्षी १५ कोटी ६३ लाख आणि रोहयो कराचे २ कोटी ६५ लाख रुपये राज्याकडे जमा करते.त्याचे रिवीजन करण्याची आमची मागणी आहे.त्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांनी अर्थमंत्र्यांशी चर्चा केली असल्याने,त्यामुळे मोठी मदत होणार आहे.त्याचा अन्य मनपालाही फायदा होणार असल्याचे माजी स्थाई समिती सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी सांगितले.कॉंग्रेस पक्षाने मागच्या विधानसभा निवडणूकीत लातूर मनपाच्या मालमत्ता करात कपात करण्याचा आश्‍वासन दिले होते,ते परवाच्या जीबीत पूर्ण करण्यात आले असून, महापौरांनी घेतलेल्या या निर्णयाचे  शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष मोईज शेख यांनी कौतुक केले.