पत्रकार भवनासाठी निधी व जागा उपलब्ध करुन देणार-आ. बाबासाहेब पाटील


अहमदपूर (उदय गुंडीले) : अहमदपूर येथे पत्रकार भवन झाले पाहिजे पत्रकारांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पत्रकार भवनासाठी निधी व जागा उपलब्ध करुन देवून लवकरच अहमदपूर शहरामध्ये पत्रकार भवन उभारणार असे प्रतिपादन विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. 
 ते येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा अहमदपूरच्या वतीने आयोजित पत्रकारांना हेल्मेट व दहा लक्ष रुपयांचा विमा वाटप कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.रा.म.पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष वसंत माधवराव मुंढे हे होते.  आ. बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते हेल्मेट व १० लक्ष रुपयांचा विमा पत्रकारांना वाटप करण्यात आला.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती दिलीपराव देशमुख, नगराध्यक्षा सौ. अश्विनीताई कासनाळे, ड. भारत चामे, उपसभापती बालाजी गुट्टे, जिल्हाध्यक्ष प्रमोद मोकाशे, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी पाटील, वैभव स्वामी, शिवानंद तात्या हेंगणे, सांब महाजन, चंद्रकांत मद्ये, नगर सेवक अभय मिरकले, निवृत्ती कांबळे, शिवराज माने, जुगलकुमार शर्मा, मोहिब कादरी आदींची उपस्थिती होती.  
 पुढे बोलताना आ. बाबासाहेब पाटील म्हणाले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी राखित जे कार्य करतात त्यांच्यासाठी हेल्मेट व विमा वाटप हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम आहे.  पुढा-यांनी, राजकारण्यांनी दररोज एक घंटा तरी वाचन केले पाहिजे.  तरच ते आपले विचार व्यासपीठावरुन व्यवस्थित रित्या मांडु शकतात.  वाचन संस्कृति जपने अत्यंत आवश्यक आहे.  वाहुतिकेचे शिक्षणाबरोबरच नैतिक्य मुल्यांचे धडे हे विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासुनच दिले पाहिजे जात न पाहता कामाची जात बघितली पाहिजे. मजबुत कार्यासाठी आमची प्रगती कमी पडत आहे असेही ते शेवटी म्हणाले. 
 आपल्या अध्यक्षीय भाषणात वसंत मुंढे म्हणाले की, खरी पत्रकारीता ही समाजाला न्याय मिळवुण देते.  अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार बांधव सदैव कार्य करत असतात.  वाडी, तांड्यावर ते मोटारसायकलवर सतत फिरत असतात.  यासाठी आमच्या पत्रकार संघाच्या वतीने आम्ही हेल्मेट वाटप व विमा देण्याचे ठरविले.  उदगीर, चाकुर, लातुर बरोबरच अहमदपूर शहरात अश्या प्रकारचा कार्यक्रम आम्ही घडवुन आणला.  संवादामध्ये मराठी भाषेला प्रथम स्थान दिले पाहिजे.   वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत.  पत्रकारांनी बातमी ही विश्वासार्हता पूर्ण लिहुन समाजाला न्याय दिला पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले.  
 यावेळी ड. भारत चामे, नगराध्यक्षा सौ. अश्विनीताई कासनाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी पाटील यांची यथोचित भाषणे झाली. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक म.रा.म.पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. विश्वंभर स्वामी यांनी केले.  
 सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म.रा.म.पत्रकार संघाचे सचिव शिवाजी पाटील वाढवणकर, उपाध्यक्ष प्रा. रत्नाकर नळेगावकर, ता. संघटक दिनकर मद्येवाड, ता. समन्वयक गजानन भुसारे, सहसचिव मेघराज गायकवाड, कोषाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, सदस्य वसंत पवार, प्रा. बालाजी कारामुंगीकर, बालाजी काळे, जगन्नाथ पुणे, वहाब मनियार, बालाजी पारेकर, शिवाजी गायकवाड, संजीवकुमार देवनाळे, अरविंद पौळ आदींसह पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.