भावीक भक्तांवर काळाचा घाला भिषण अपघातात दोन ठार, तीन गंभीर जखमी


 अहमदपूर/उदय गुंडीले :- अहमदपूर काजळ हिप्परगा दरम्यान पुलाच्या कठड्यावर कार आदळून दोन ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.
 सविस्तर माहिती अशी की, अहमदपुर तालुक्यातील किनगांव येथील भाविक कोबंराळी येथील खंडोबा देवाच्या दर्शन करुन परतताना गाडी क्रमांक एम.एच १६,सी.सी-०३६९ या क्रमांकाची टाटा झेस्ट कंपनीची गाडी पुलाला धडकून राजाराम मारोती डिगोळे (५०),सिकंदर गौस शेख (२६) हे जागीच मृत्यू झाले. तर उत्तम बालाजी देवदे (२५),माधव भागवत  देवदे(२५), सोपान निवृृत्ती देवदे ( ४०) हे गंभीर जखमी झाले आहेत.अपघातग्रस्तांना काजळ हिप्परगा ग्रामस्थांनी मदत करुन उपचारासाठी तात्काळ पाठवून दिले.जखमींना लातूर येथील दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. चा प्रकरणी अहमदपूर पोलीसात गुन्हा दाखल झाला असून अहमदपूर पोलीस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी  यांच्या मार्गदर्शनाखाली एस.आय.भास्कर सूर्यवंशी तपास करत आहेत. यावेळी पो.हे.कॉ. सुहास बेंबडे,पी.एस.आय.पाटील व्ही.पी.,पो.कॉ.सोनवने होते.