- हेमंत मुसरीफ पुणे.
कुठे जाईलं ती सत्ता
उगाचं राही ताठ्यात
आपलीचं आहे गाय
येईल परत गोठ्यात
असंगाशी केला संग
व्यापार गेला तोट्यात
इतके दिसं कमवलेलं
हरून बसलो सट्टयात
जीत देतो म्हणणारे
सोडून गेले काट्यात
तराजू त्यांच्या हाती
वजन मारे काट्यात