आज दिल्ली विधानसभेत आपला स्पष्ट बहुमत मिळालं याचाच अर्थ असा की, देशात फुकट गोष्टी देऊन काहीही करता येतं. दिल्लीत विजयी झालेली आम आदमी पार्टी मुफ्तखोरीस सबलीकरण देत फुकट्यांची दिवाळी करत आहे. परंतू केजरीवाल सरकारकडून मुफ्त दिल्या जाणार्या गोष्टी काही आभाळात पडत नाहीत किंवा केजरीवाल काही मायावी पुरुष किंवा देव नाहीत. तर ते आपलाच पैसा आपल्यालाच मोफत मोफत या हाताने घेऊन त्या हाताना देत आहेत (म्हणजे म्हशीचा मूत म्हशीलाच पाजत आहेत) हे येथील जनतेच्या लक्षात कसे लक्षात येत नसावे ? दिल्ली विधानसभा क्षेत्रात केजरीवालांनी आपल्या प्रशासकीय सेवेत राहून घेतलेला प्रशासकीय अनुभव आणि त्यानंतर अण्णा हजारेंच्या उपोषणा दरम्यान केलेले स्वतःचे ब्रँण्डींग हे या निवडणूकीत कामाला आलेय हे मात्र नक्की. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय केलं काय नाही याचा आजपर्यंत कोठे काही गवगवा आपणास ऐकायला मिळाला नाही. पण अण्णा हजारेंच्या उपोषणा नंतर त्यांचा देशात मोठा गवगवा झाला. केवळ माणूसधर्म पूजक स्वतःला भासणार्या केजरीवालांनी अनेक वेळा आपले ब्रँण्डींग करताना हनुमान, दत्तात्रयांसह अन्य देवतांचा सुध्दा अधार घेऊन ब्रँण्डींग केलेलं अनेकानी अनुभवलय. उच्चशिक्षीत आणि प्रशासकीय अधिकारी असल्याने त्यांना राज्यकर्त्यां बरोबरच देशाच्या आम आदमीची नाडी चांगल्या प्रकारे जाणता आली. त्यांनी अतिशय धूर्तपणे ही नाडी तपासून कोणाला कोणाच्या प्रयोगाने थंडावता येते हे जाणून त्यांनी राज्यसत्ता हस्तगत केली. दिल्लीच्या पहिला विधानसभेत मिळालेले यश धुडकावून अतिशय सोपस्करपणे त्याचे विपर्यास विरोधकांवर टाकत त्यांनी पुन्हा दिल्ली विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. एकंदरीत कोणी आपल्या शिक्षणाचा, नितीमत्तेचा, संस्कारांचा आणि बुध्दीमत्तेचा उपयोग सत्कार्यासाठी करतं तर कोणी धूर्तपणाने इतरांना हिन लेखण्यासाठी. दिल्ली विधानसभेसाठी मतदान झालं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57 टक्क्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी होती. संध्याकाळच्या टप्प्यातले आकडे अजून यायचे होते आणि दिल्ली परिसरात भाजपाला वाढिव मतांच्या अफवा उठल्या. या अफवांचे पेव फुटताच केजरीवालांनी तात्काळ विरोधकांवर शरसंधान साधत सरडी रंग दाखवत इएमव्हीला टार्गेट करण्याचा प्रयत्नही केला होता. तर दुसरीकडं दिल्लीतल्या इतर भागात कमी, मध्यम असा प्रतिसाद मिळत असताना केरजीवाल पुरस्कृत परंतू काँग्रेसचे बॅनर लागलेल्या शाहीन बाग परिसरात मात्र नागरिकांनी मतदानाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. सकाळपासूनच इथं मतदानासाठी गर्दी होती. आता हे सगळे मतदानाचे पॅटर्न पाहताना याचा फायदा कोणाला होणार? फटका कोणाला बसणार? दिल्लीकरांचा मूड काय सांगतो? त्याच अनुषंगानं एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे या सगळ्याचे अंदाज दिले गेले. दिल्लीतलं मतदान संपल्यानंतर आता दिल्लीचा मूड सांगणारा हा सर्वात मोठा एक्झिट पोल इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी घोषीत ही केला. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70 जागांपैकी 67 जागांवर दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला खातं देखील उघडता आलेलं नव्हतं. परंतू यावेळी मात्र दिल्लीमध्ये पुन्हा एकदा केजरीवाल यांचेच सरकार येणार असून अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक साधणार असल्याचा अंदाज न्यूज चॅयनलनी आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला. भाजपने केलेला जोरदार प्रचार आणि टीकांच्या आक्रमणासमोर आम आदमी पार्टीकडेच दिल्लीचा गड राहणार असल्याचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 70 जागांपैकी आम आदमी पक्षाला 51 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज होता. त्या आकड्यानुसार पुन्हा एकदा केजरीवाल यांची एकहाती सत्ता दिल्लीत येण्याची चिन्हे आहेत. भाजपला यावेळी 15 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 1 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी भाजपने उभे केलेल्या मनोज तिवारी यांची जागा देखील धोक्यात असल्याचे या सर्व्हेत सांगण्यात आले आहे. एकंदरीत काय तर आपल्या देशात निवडणूका ह्या वेगवेगळ्या अमिषांनी जिंकल्या जाऊ शकतात याचा अभ्यास केजरीवालांनी केला आणि तो सिध्द ही करुन दाखवला आहे. आता सर्व सामान्य जनतेला सक्षम आणि सबळ करण्याची भाजपाची भूमिका ही देशातील कोणत्याच भागातील जनतेला मान्य नाही. आणि त्यातल्या त्यात ज्या भागात घुसखोरी करुन अन्य राज्य, देश वा परिसरातून आलेले नागरिक आहेत त्यांना तर मुळीच नाही. असाच प्रकार दिल्लीमध्येही पहायला मिळतो. येथे पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळसह अन्य परराष्ट्रांतून तसेच दिल्लीच्या जवळपासची राज्य यामधून आलेले अनेक नागरिक ज्यांना येथे स्थिर होण्यासाठी सरकारचे मुफ्तखोरीचे हे धोरण लाभदायक ठरणारे असून पुढील काळात ही अशाच फुकटच्या योजनांच्या अमिषांनी अशा लोकांनी केजरीवाल सरकारला पसंती दिलेली आपणास पहायला. मिळते परंतू जनतेचं पालकत्व घेणारा तोच खरा जो आपल्या पाल्याला स्वतःच्या पायावर उभार करुन सक्षम व रोजगाराभिमुख बनवेल. परंतू काँग्रेस सरकारचा फुकटी धोरणाचा अवलंब करत जनतेला केवळ आयते तुकडे मोडण्याची सवय लावून त्यांच्यावर आर्थिक आणि राजकिय वर्चस्व प्रस्तापित करत राज्य करण्याचे धोरण केरजीवालांनाही अतियश चांगल्या कौशल्याने आत्मसात केलंय हे मात्र नक्की. परंतू जनकल्याणाच्या नावानं जनतेलाच मुर्खात काढून सत्ताकारण करणार्यांची आज राजकारणात चलती आहे हे या निवडणूकीत पाहून नवल वाटायला लागलय.
आपचा विजय; फुकट्यांची दिवाळी