लातूर/प्रतिनिधी :- लातूर महापालिकेत सततच घोट्याळ्यावर घोटाळा झाल्याचे ऐकावयास मिळत होते.मात्र आज खुद्द भाजपाचे नगरसेवक प्रकाश पाठक यांनी पत्रकार परिषद घेवून मागील पाच वर्षात लातूरच्या महापालिकेत १ हजार कोटी रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा भोपळा फोडला असून महापालिका स्थापन झाल्यापासून मागील पाच वर्षात म्हणजेच २०११-१६ या कालावधीत १ हजार कोटी रूंपयांचा गैरव्यहार कसा झाला याबाबत पाठक यंानी पत्रकारासमोर पाढा वाचला या गैरव्यवहारात मनपातील अधिकारी,कर्मचारी,गुत्तेदार आदि गंतलेले असून यांच्यावर कार्यवाही करून त्यंाची चौकशी करण्यासाठी एसआरटी गटीत करावी,अशी मागणी भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रकाश पाठक यांनी मुंबईच्या प्रधान सचिव नगरविकास विभागकडे केली असल्याने मनपाचे ढाबे दणाणलेले आहेत.
लातूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर लोकनेते विलासराव देशमुख यांनी महापालिकेला भरघोस निधी दिलेला होता.त्या काळात महापालिकेने कामेही जोरदारपणे केलेली होती.मात्र लोकनेते विलासराव स्वर्गवाशी झाल्यानंतर महापालिकेत ठणठणात सुरू झाला.२०११-१६ या पाच वर्षात महानगरपालिकेत वेगवेगळ्या विभागअंतर्गत मोठमोठी कामे केली गेली.या कामाची निवड आणि कामाचा दर्जा त्या कामावर केलेला खर्चाच्या बाबतीत कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे याचे लेखापरिक्षण केले जाते.मात्र हे लेखा परिषण करताना प्रत्येक वर्षी त्या त्या वर्षांतीलच चार महिन्याचे करून त्याप्रमाणे अवहाल पाठविला जातो या अवहालावर किमान ४ महिन्याच्या आत महापालिकेच्या आयुक्तांनी त्याचा कार्यपालन अवहाल शासनाकडे पाठविणे बंधनकारक आहे.यामध्ये नगरसेवक पाठक यांनी या गैरखर्चास,व्यवहारास आक्षेप घेत चौकशीची केली होती.पंरतु महापालिका आयुक्तांनी यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.महापालिकेतील लेखापरिक्षण अवहालानुसार पाच वर्षातील चार महिल्याच्या व्यवहारात ३१४ कोटी ८५ लाख ७८ हजार ७०९ एवढी रक्कम बेकायदेशीर व नियमबाह्य खर्च केली गेल्याचे आडीटमध्ये नमूद केलेले आहे.तसे पाहिलेतर याप्रमाणे पाच वर्षासाठी हे सूत्र लागू केले तर सन २०११-१६ यादरम्यान महापालिकेमध्ये १ हजार कोटी बेकायदेशीर व नियमबाह्य खर्च केल्याचे निष्पन होते.
लातूर महापालिकेच्या या गैरव्यवहाराबाबत शासनाने महापालिकेतील अधिकारी,कर्मचारी आणि ठेकेदार यांची एसआटी मार्फत चौकशी करून त्यांच्यावर फोवजदारी गुन्हे दाखल करावीत अशी मागणी नगरसेवक प्रकाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
बापरे...नगरसेवकांनेच फोडला लातूर महापालिकेतील १ हजार कोटीचा भोपळा