लातूर (प्रतिनिधी):-लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅक म्हणजे शेतकर्यंाची बँक म्हणून ओळखली जाते.सहसा शेतकर्यांचा सर्वच व्यवहार जिल्हा बॅकेतून होत असतात त्यामुळे बॅकेचे संचालक मंडळ आणि चेअरमॅन ऍड.श्रीपतराव काकडे बॅक सुधारण्यासाठी प्रयत्न कसोसीने प्रयत्न करत आहेत.त्यांनी बॅकेचे व्यवहार किंवा बॅकेची महत्वाची माहिती सर्वापयर्ंंत पोहचण्यासाठी सद्या मोबाईल वाटप करण्याचा धडाका घेतला असतानाच काल देवणी तालूक्यातील तळेगाव (भो) या गावातील जिल्हा बॅकेच्या शाखेमध्ये ६४ लाख ८९ हजार ४४९ रूपयांची अपरातपर करून बॅकेचे ठेवीदार व खातेदारांचा विश्वासघात केला असल्याचे उघड झाल्याने या बॅकेतील ३ कर्मचार्यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा सद्यातरी दाखल केलेला असून या घोटाळ्यात ५० लाखाहून अधिक घोटाळा झाला आहे.किंवा नाही याबाबत पोलिस तपास करत असून देवणी तालूक्यातील एका बॅकेत हा घोटाळा उघकीस आला आहे.तर जिल्ह्यातील आणखी किती बॅकेत असा प्रकारचा घोटाळा झाला असेल का?याबाबत बॅक प्रशासनाने शेतकर्यांच्या पैशाची लूट थांबवावी अशी मागणी शेतकर्यासह खातेदाराकडून होत आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आदर्श बँक म्हणून ओळखली जाते. दरवर्षी या बँकेच्या व्यवहाराचे अंतर्गत ऑडीटही होते. या बँकेत विशेष करून शेतकर्यांची खाती, त्यांच्या ठेवी असतात, असे असतानाही जिल्हा बँकेच्या तळेगाव (भो.) या शाखेमध्ये १ ऑक्टोबर २०१५ ते १५ जानेवारी २०२० या कालावधीमध्ये ठेवीदार, खातेदार यांच्या ६४ लाख ८९ हजार ४४९ एवढ्या रकमा बँकेतील कर्मचारी सतीष यशवंतराव गायकवाड रा. उदयगिरी कॉलनी उदगीर, महादेव वैजनाथ नाबदे व विनायक गायकवाड या तीन कर्मचार्यांनी ठेवीदार व खातेदार यांच्याकडून या रकमा स्वीकारल्या मात्र त्याची नोंद बँकेच्या अभिलेखावर न करत एवढ्या मोठ्या रकमेचा परस्पर वापर केला ही रक्कम बँकेत जमा केली नाही म्हणून या तिघांच्या विरोधात भादंवि ४०९, ४२०, ४७७ (ए) व ३४ अन्वये देवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहारातील रक्कम मोठी असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे प्रकटीकरण लातूर शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सहाय्यक व्यवस्थापक मुख्य कार्यालय लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूर श्री राजेंद्र ज्ञानदेव जगताप यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही बँक शिस्तीची बँक मानली जाते. या बँकेमध्ये एक पैशाचाही गैरव्यवहार होत नाही असे सांगितले जाते. असे असतानाही गेल्या पाच वर्षांत केवळ बँकेच्या एका शाखेत सुमारे ६५ लाखांचा गैरव्यवहार होतो. तोपर्यंत बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या हा प्रकार लक्षात आला नाही की, या प्रकरात बँकेतील अन्य कोणता वरिष्ठ अधिकारी सहभागी आहे काय? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे. या अपहार प्रकरणी अद्याप कोणास अटक करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही.
देवणी तालूक्यातील कर्मचार्यांनी ६५ लाख रूपयांचा घोटाळा