कोरोनाच्या भितीपोटी सर्वत्र निर्मणूष्य स्थिती ; खबरदारीसाठी सजगता गरजेची

प्रवाशांना गांभिर्याने तपासूनच शहरात सोडावे


बस स्थानके, रेल्वे स्टेशन, ट्रॅव्हल्सचे थांबे आणि नाकेबंदी पध्दतीने तपासणी करावी
बाहेर गावांहून येणार्‍या संक्रमित नागरिकांपासूनच ह्या रोगाचा प्रार्दूभाव जगात सगळीकडे वाढलेला आहे. त्यामुळे कोरोना या रोगाच्या ठोस औषधाच्या संशोधनापर्यंत आपणा सर्वांना याच्या संक्रमणापासून वाचने हाच एक सर्वात प्रभावी उपाय आहे. आता हे करण्यासाठी शास्त्रोक्त निकषांनुसार सॅनेटरायजेशना बरोबरच बाहेरगावच्या नागरिकांशी संपर्क न होऊ देणे, त्याशिवाय बाहेर गावांहून म्हणजे पुणे, मुंबई किंवा अन्य कोणत्याही मोठ्य शहरांतून किंवा परदेशांतून येणार्‍या नागरिकांची गावो गावी गावांच्या किंवा शहरांच्या बाहेरच तपासणी करुन त्यांना गावात किंवा शहरात त्यांच्या मुळ घरी जाण्याची परवानगी देणे प्रभावी ठरेल. यामुळे गावात या रोगाचा संपर्क किंवा सक्रमण न झालेल्या नागरिकांना हा रोग होण्यापासून वाचवता येईल. त्यासाठी प्रभावी उपाय म्हणून बाहेर गावांहून येणार्‍या नागरिकांना प्रत्येक शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणीच शहरात प्रवेश करणार्‍या बस, ट्रॅव्हल्स, रेल्वे स्थानकावर, किंवा खाजगी वाहनाने येणार्‍या वाहनांची तपासणी येथे होणे गरजेचे आहे. ज्या ज्या शहरांमध्ये खाजगी वाहने, बस, ट्रॅव्हल्स शहरात प्रवेश करतात अशा ठिकाणी नाके उभे करुन येथेच सर्वांची तपासणी करुन त्यांना गावात किंवा शहरात प्रवेश द्यावा जेणे करुन त्यांच्याकडून गावातील किंवा शहरातील नागरिकांमध्ये कोरोनाच्या विषाणूंचे संक्रमण होणार नाही किंवा संक्रमण होण्याचे प्रमाण कमी असेल. 


लातूर/ प्रतिनिधी ः जगाला विळखा घालून महामारीची परिस्थिती निर्माण केलेल्या 
कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र होत असून जगातील कानाकोपर्‍यात भितीचे 
वातावरण निर्माण झालेले आहे. असे असताना मात्र मराठवाड्यातील प्रशासकिय यंत्रणांकडून मोठ्या शहरातून किंवा परदेशातून येणार्‍या प्रवाशांच्या तपासणीच्या बाबतीत गांभिर्य नसल्याचे जाणवत आहे.
चिनच्या निष्काळजी पणामुळे कोरोना रोगाचा विषाणू तेथील संक्रमित होऊन आज संपूर्ण जगात पसरला आहे. परंतू एवरी कुठल्याही कामात पारदर्शकता आणि दक्षतेच्या नावाने स्वतःची पाठ थोपटून घेऊन सर्वत्र पुढाकाराने मिरवणार्‍या मराठवाड्यातील प्रशासकिय यंत्रणेने मात्र झपाट्याने पसरणार्‍या कोरोना सारख्या महामारीला रोखण्याच्या ठोस उपाय योजनांमध्ये त्याच्या संक्रमणाचे मुख्य स्त्रोत जाणून त्यावर उपाय करण्यात हतबल होताना दिसतेय.
 गर्दीच्या ठिकाणी संक्रमित झालेला कोरोनाचा हा विषाणू हा हा म्हणता म्हणता चिनशी व्यावसायिक वा अन्य प्रकारचे संबंध असलेल्या शेजारी राष्ट्रांमध्ये त्याच वेगाने फोफावला. आज कोरोनाने आघोरी रुप धारन करुन अक्षरशः जगाला वेठीस धरल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. अशा वेळी संपूर्ण जगाने या विषाणू पासून म्हणजेच थोडक्यात कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करुनच आपला बचाव होऊ शकतो हे वास्तव जगाने मान्य केलेले आहे. असे असताना परदेशातून येणार्‍या किंवा मुंबई पुण्यासारख्या शहरांतून येणार्‍या नागरिकांची त्यांच्या प्रवाशी ठिकाणांवरच योग्य ती खबरदारी घेऊन त्यांच्यापासून होणार्‍या संक्रमणावर ठोस उपाय केल्यास त्यावर अंकुश ठेवणे शक्य होईल. पुणे, मुंबई वा अन्य मोठ मोठ्या शहरांमध्ये कोरोनाच्या भितीमुळे येथे कामासाठी गेलेले अनेक नागरिक आपल्या गावी परतत आहेत. असे असताना हे प्रवाशी ज्या माध्यमाने प्रवास करतात म्हणजे, विमान, रेल्वे, बस, ट्रॅव्हल्स किंवा त्यांच्या वैयक्तिक वाहनांनी प्रवास करुन गावी येत असतील तर त्यांना नाकेबंदी सदृश्य ठिकाणे निर्माण करुन अशाच ठिकाणी त्यांच्या स्वास्थ्याची संपूर्णपणे योग्य ती रितसर तपासणी करुनच निर्जंतूक असलेल्या मराठवाडा परिसरातील शहरांमध्ये वा गावांमध्ये प्रवेश दिल्यास ह्या रोगाच्या संक्रमणावर मोठ्या प्रमाणात आळा घालता येईल. कारण की, बाहेर गावांहून गावी येणार्‍या नागरिकांच्या या परिसरातील नातेवाईकांचे संपर्क येणारच आणि त्यातून ह्या 
रोगाचे संक्रमण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात नाकारता येत नाही. अशा वेळी एकदा का याचे संक्रमण हाता बाहेर गेले तर शासकीय यंत्रणांना पळता भूई थोडी होईल. यातून शासकीय यंत्रणांबरोबरच आर्थिक वा सर्वच प्रकारच्या हानीला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागेल. म्हणून कोरोना सारख्या रोगावर सध्यातरी कुठल्याच प्रकारचा ठोस विलाज उपलब्ध न झाल्यामुळे त्याच्या संक्रमणापूर्वी खबरदारी हाच उपाय समजून त्याचे परगावातून येणार्‍या नागरिकांपासून संक्रमण टाळणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी यंत्रणांनी मोठ मोठे दवाखाने, मोठ मोठ्या प्रयोगशाळा, एमर्जन्सी वार्ड, वा अन्य गोष्टींची सजावट करत असण्यापेक्षा जेथून या रोगाच्या संसर्गाची किंवा संक्रमणाची जास्त शक्यता आहे अशा प्रवाशांच्या तपासणीवर जास्त भर दिल्यास हे कार्य प्रभावी ठरेल आणि संक्रमित रुग्ण आम जनतेत मिसळून त्याचा प्रादूर्भाव वाढवण्यास कारण ठरणार नाहीत. 


 


देवाच्याही द्वारी नको क्षणभरी...!
कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवल्याने जेथे आपल्या मनःशांतीसाठी आणि आपल्या आशा अकांक्षांच्या पूर्तीसाठी माणूस दिवसाकाठी किंवा दिवसाच्या सुरुवातीला जातो ती देवाचीही दारे आता कोरोनाच्या भितीपोटी बंद झाल्याने अनेक ठिकाणी आता देवाच्याही द्वारी नको क्षणभरी असे म्हणायची वेळ आलेली आहे. कारण कोरोनाचा प्रादूर्भाव गर्दीच्या ठिकाणातून होत असल्याने सर्वांनी गर्दी टाळणेच योग्य असल्याने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे.