देगलूर तालुक्यातील खानापूर फाट्याजवळ महिनाभरातील तिसरी घटना
देगलूर/प्रतिनिधी :- खानापूर फाट्याहून गावा कडे जाणाऱ्या ऑटोला मुखेड तालुक्यातील चोंडी येथून देगलूर कडे येणाऱ्या मोटारसायकलच्या समोरासमोरील धडकेत ऑटोतसवार एका महिलेचा जागीच मृत्यू झाली. तर मोटरसायकल स्वारांसह इतर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
खानापूर फाट्याजवळ बुधवार दिनांक १८ मार्च रोजी सायंकाळी घडलेली घटना. या घटनेत ऑटो क्रमांक एम. एच. २६-१४५ मधून देगलूर हुन गावाकडे जाण्यासाठी काही प्रवाशी प्रवास करीत होते मोटरसायकल क्रमांक एम. एच.२६ ८४७२ यावर शेख युसुफ इस्माईल चोंडी तालुका मुखेड वय २२ हा देगलूर कडे जात होता खानापूर फाट्याजवळ या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन लक्ष्मीबाई भुजंगराव सावरगावे राहणार अल्लापुर वय ५० ही महिला जागीच ठार झाली तर रसूल, मारुती अकडेमोड वय ४५ राहणार तडखेल मारुती उमला राठोड वय ७५ रा. तडखेल तांडा, मारुती निवृत्ती वाघमारे शंकर नगर वय ३० वर्ष चंदरबाई शंकर बिजलिकर वय ५० रा.अल्लापुर हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून काही गंभीर जखमींना नांदेडला हलविण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मागील एक महिन्याभरात खानापूर फाट्याजवळील ही तिसरी घटना आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी घटना स्थळी उपस्थित नागरीकांनी मदत केली.