लातूर (प्रतिनिधी):-लातूर शहरात मागील अनेक महिन्यापासून चौेकाचौकात वाहतूक पोलिसांची टोळी थांबून वेमापपणे दंड वसूल केला जात आहे.हम करो सो कायदा म्हणार्या वाहतूक पोलिसांनी अक्षरशा लातूरकरांना शहरात मोटारसायकल चालवणे फारच अवघड झालेले आहेत.गल्लीबोळात वाहतूक पोलिस थांबवून मोटारसायकल स्वाराना अडवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करत आहेत.त्यांतच अशाप्रकारे काल शहरातील गुळ मार्केट परिसरात वाहतूक पोलिसांनी एका मोटारसायकल स्वाराला आडवून कागदपत्राची विचारणा केली असता.त्या तरूणाने वाहतूक पोलिसांच्या तोडावर बुक्की मारली असता त्या पोलिसांचे एक दात पडला असल्याने पोलिस फोजदाराचा पारा चडला.त्यामुळे त्यादोन मोटार सायकल स्वाराला गुळमार्केटपासून गांधी चौक पोलिस ठाण्यात ओढत आणत त्या दोघावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, लातूर शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी मुन्वरखॉं तैमूरखॉं पठाण हे गुळ मार्केट लातूर येथे कर्तव्यावर होते. त्यांना एम.एच.२४-एआर-६४६१ या क्रमांकाची फॅन्सी नंबरप्लेट असलेली दुचाकी दिसून आली. पोलीस कर्मचारी पठाण यांनी याबाबत त्यांना हटकले. तेंव्हा या दुचाकीवरील अशोक नवनाथ भिसे रा.पिंपरीअंबा, ता. लातूर हा. मु. चौधरीनगर लातूर व सुनील नानासाहेब ओहाळ रा. अवंतीनगर लातूर या दोघांनी पठाण यांच्याशी हुज्जत घातली. त्यांना अरेरावीची भाषा केली. एवढेच नव्हे तर त्यांच्याशी धक्काबुक्की केली. यावेळी अशोक भिसे याने पठाण यांच्या तोंडावर जोराचा ठोसा मारला असता यात पठाण यांचा वरचा दात पडला. या प्रकरणात पठाण यांच्या फिर्यादीवरून भिसे व ओहाळ याच्या विरोधात फॅन्सी नंबर लावला, वाहनाचा विमा उतरविला नाही हे कारण व मारहाण करून दात पाडला, शासकीय कामात अडथळा आणला, धमकी दिली, हुज्जत घातली म्हणून भादंवि ३५३, ३३२, ३२५ व मोटार वाहतूक कायदा कलमानुसार गांधी चौक पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस जमादार कांबळे हे करीत आहेत.
पोलीस कर्मचारी पठाण यांनी सदर मोटारसायकल चालकाकडे गाडीचे कागदपत्रे मागितली. तेंव्हा तुम्हाला गाडीचे कागदपत्रे मागण्याचा अधिकार नाही, असे म्हणत हुज्जत घातली. ही मोटारसायकल त्यांच्या ताब्यातून पोलीस ठाण्याकडे घेवून जात असताना या तरूणांनी पोलीसांच्या बाबतीत जीएसटी कार्यालयासमोर हा प्रकार केला.
तरूणाने वाहतूक पोलिसंाचे पाडले दात, मोटारसायकल स्वाराला पोलिसांनी मागितली कागदपत्रे