बसवेश्वर जयंतीनिमित्त इष्टलिंग महापूजा

 


लातूर (प्रतिनिधी):-समाजाला समतेचा संदेश देणारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त घरातूनच अभिवादन करण्यात आले. शहरासह जिल्ह्यातील बसव प्रेमींनी बाहेर जाणे टाळत घरीच इष्टलिंग महापूजा केली.यानिमित्ताने महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे आपण सच्चे अनुयायी असल्याचे शहरातील नागरिकांनी दाखवून दिले . आज रविवारी ( दि.२६ )महात्मा बसवेश्वरांची जयंती होती .लातूर शहरात दरवर्षी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात .यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलेले आहे . नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यावर्षी जयंती घरातच साजरी करावी असे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत समाजातील बहुतांश नागरिकांनी बाहेर येणे टाळले . बसवेश्वर जयंतीनिमित्त घरोघरी इष्टलिंग महापूजेचे आयोजन करण्यात आले होते .कुटुंबातील सर्वच सदस्यांनी यात सहभाग घेतला .दरवर्षी बसवेश्वर चौक आणि बसवेश्वर महाविद्यालयानजीक असणार्‍या पुतळ्यास अभिवादन करण्यास मोठी गर्दी होते .परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे ऐकून नागरिकांनी बाहेर पडण्याचे टाळले.महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे आम्ही अनुयायी असल्याचे दाखवून दिले .समाजाच्या भल्यासाठी जे- जे करणे आवश्यक आहे ते केले पाहिजे हीच शिकवण बसवेश्वरांनी दिली आहे . त्याचे अनुकरण करत आम्ही घरातच इष्टलिंग महापूजा केल्याचे नागरिकांनी सांगितले .