समाजात विष पेरणार्यांवर कडक कारवाई केली जाईल
संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोनाला प्रतिकार करत असताना नागरिकांनी सयंमाने आपल्याच घरी राहून सकारात्मकतेने सामोरे जायला हवे. सध्या मात्र काही अतिउत्साही नागरिक समाज माध्यमांवरुन आपली बौध्दिकता गहाण ठेऊन सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश पसरवत आहेत. ज्यामुळे कोरोना रोगाच्या प्रादूर्भावापासून कमी पण सोशियल मिडीयावरील नकारात्मक संदेश आणि व्हायरल होणार्या व्हिडीओमुळे सामाजिक अस्थिरता निर्माण झाल्याचे दृष्य निर्माण झालेले आहे. यामुळे हिंदू-मुस्लिम बांधवांत सामाजिक दुरावा निर्माण होताना दिसत आहे. सध्या जगात जाती धर्माच्या पलिकडे जाऊन कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सर्वांनी एकत्र येऊन माणूस म्हणून सामना करण्याची गरज आहे. एकत्र येऊन कोरोनाला समूळ नष्ठ करण्याचे कार्य करणे अपेक्षीत आहे. परंतू काही विकृत वृत्तीचे लोक समाजमाध्यमांवर सामाजिक बांधिलकी नष्ठ करणारे संदेश पसरवून आपल्या विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन करताना दिसत आहेत. अशा लोकांना प्रशासनाकडून येत्या काळात कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल त्याशिवाय सामाजिक विष पेरणार्यांवर कायद्याच्या तरतुदींनुसार कडक कारवाई करण्याची भूमिकाही लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दूरध्वनीवरुन व्यक्त केली आहे.
लातूर / प्रतिनिधी ः कोरोनाच्या प्रार्दूर्भावाने परेशान असलेल्या प्रशासनाला समाज माध्यमांवरील अतिउत्साही फेक मॅसेजेर्सनीं हैराण करुन सोडलेलं आहे. त्यामुळे कोरोना या जागतिक महामारीला निष्प्रभ करण्यासाठी सर्व भारतीयांनी सामाजिक एकात्मचे दर्शन घडवत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे. कोरोना हा रोग कोणत्या जाती, धर्म, वंशाला पाहून जडत नाही तर तो एकमेकांच्या संपर्कामुळे होतो ही बाब लक्षात घेऊन सर्वांनी आपले दैनंदिन व्यवहार करावेत आणि प्रशासनाच्या लॉकडाऊनला सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जागतिक स्तरावर निर्माण झालेला कोरोनाचा कहर पाहता इतर प्रगत आणि विकसनशिल देशांच्या तुलनेत आपल्या देशात आणखी तेवढी भयान परिस्थिती निर्माण झालेली नाही. ही सकारात्मक बाब असताना सुध्दा यामध्ये देशातील प्रत्येक नागरिकाच्या, प्रशासनाच्या आणि येथील प्रशासकीय अरोग्य, स्वच्छता कर्मचारी आणि कोरोना वॉरिअर्सच्या दक्षतेमुळं शक्य झालेलं आहे ही बाब तेवढीच खरी आहे. असे असले तरी प्रत्येक भारतीयांने कोरोना या रोगाच्या विरुध्दची लढाई लढताना सामाजिक एकात्मतेचे प्रदर्शन घडवून कोरोनाशी दोन हात करण्यात आपला हातभार लावावा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
आज पर्यंत संपूर्ण जगात कोरोनाने कहर माजवल्याने संपूर्ण मानवजातीत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोनाच्या प्रभावा पासून प्रत्येक व्यक्तीला वाचवण्यासाठी आपल्यातीलच आपले भाऊ बंद, जे की सरकार कर्मचारी, पोलीस, प्रशासकीय अधिकारी, अरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी हे आहोरात्र आपल्या जीवाचे रान करुन हे प्रयत्न वाचवण्याचा करीत आहेत. अशाच काळात काही थोडक्या अविचारी लोकांच्या वर्तनामुळे ह्या रोगाबरोबरच सामाजिक तेढ निर्माण करणारे विष पसरवण्याचे काम केले जात आहे.
कोणत्याही आधाराशिवाय समाज माध्यमांवरील काही मर्कटवृत्तीचे लोक धार्मिक आधारावर संदेश पोहचवून कोरोनाच्या प्रादुर्भावा बरोबरच सामाजिक अस्थिरतेचं विष पेरण्याचं काम करत आहेत. एकीकडे मानवतेच्या नावाने कंठ काढणारी हि मंडळी कोरोनाच्या लढाईत सक्रिय विकृत वृत्तीने सक्रिय असल्याचे पाहवयास मिळत आहे.
मुठभर विध्वंसकवृत्तीची माणसं प्रत्येक जातीधर्मात अपप्रचार करुन अर्धवट बौध्दिकतेचे प्रमाण दाखवत आहे. समाज माध्यमांवरील म्हणजे फेसबुक, व्हॉटसऍप व अन्य समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश, व्हिडीओ यांनी सळोकी पळो करुन सोडलंय. इतर धर्मीयांमुळं आपलं अस्तित्वच संपणारय जणू अशा अनेकविध विचारानं घाबरुन व मनात द्वेष निर्माण होऊन सर्वसामान्यांची नुसती भांबरी उडवली आहे. कोणतीही अफवा पसरवताना अथवा अविवेकी विचार पसरवताना, समाजातल्या बुद्धीवाद्यांनी काय योग्य? आणि काय अयोग्य? याचा विचार करायला हवा. आजच्या आपल्या अशा अविवेकी संदेशांमुळे आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना बर्बाद तर करत नाहीत ना असाही विचार करणं गरजेचं आहे.
कोरोना कशामुळं आला?
कोरोना कशानं जाणार?
कोण किती चांगले किती वाईट?
मुस्लीमांमुळे हिंदू संकटात?
हिंदुंमुळे मुस्लीम संकटात?
अशा एक ना अनेक स्वयंघोषित अविचारी तज्ज्ञांमुळे समाज माध्यमांवर उच्छाद मांडलाय हे मात्र नक्की. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे हे शासन ओरडून सांगत आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानांना साद घालत सोशियल डिस्टन्सचे पालन करुन त्यांनी सांगितलेल्या उपायाचं पालन करण्याचा आव्हान असताना मात्र आपल्याकडची मंडळी गर्दीच्या रुपाने एकत्र येऊन, प्रार्थना करणं, दिव्यांच्या ऐवजी टेंभे पेटवणं, रॅल्या काढणं, घंटानाद करत बायका-मुलांसह गल्लीबोळात फिरणं, फटाके उडवणं हे ह्या बाबी सुध्दा त्यांच्या विकृती दर्शवीत आहेत. अशा वृतींपासून दूर राहून सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती जिल्हाधिकार्यांनी केली आहे.