लातूरकरांनो सावधान आत्ता तरी घराबाहेर पडू नका
लातूर / प्रतिनिधी ः मागच्या अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याची समाधान कारक समाधानकारक बाब होती. हरयाणा राज्यातील नुह जिल्हयातील फिरोजपुर झिरका येथे गेल्या तीन महिन्यापासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले बारा यात्रेकरु दोन एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्हयातील निलंगा येथील मशिदीत आढळून आले होते. आपल्या गावाकडे जाणार्या १२ जणांपैकी ८ रुग्ण कोरोना संक्रमित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे लातूरकरांनो सावध रहा, आत्ता तरी घराबाहेर पडू नका असा सावधानतेचा ईशारा देण्यात येत आहे. त्यामुळे लातूरकरांनी यापुढे किमान १४ एप्रिल पर्यंत तरी घरात बसूनच भविष्यात निर्माण होणारा धोका टाळावा अशी अपेक्षा जाणकरांकडून करण्यात येत आहे.
आज पर्यंत संपूर्ण जगात कोरोनाने कहर माजवल्याने संपूर्ण मानवजातीत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोनाच्या प्रभावापासून प्रत्येक व्यक्तीला वाचवण्यासाठी आपल्यातीलच आपले भाऊ बंद, जे की सरकार, पोलीस, प्रशासकीय अधिकारी, अरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी हे आहोरात्र आपल्यासाठी जीवाचे रान करुन हे प्रयत्न करीत आहेत. अशाच काळात काही थोडक्या अविचारी लोकांच्या वर्तनामुळे हा रोग भरमसाठ प्रमाणात जगात आपला कहर माजवत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सावधान राहून घराच्या बाहेर पडू नये अशी अपेक्षा करण्यात येत आहे.
दिल्ली येथे नुकत्याच पाडलेल्या मरकत तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामुळे मागच्या चार पाच दिवसांत देशात एकूण कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येत जवळपास ६५ % प्रमाणात वाढ झालेली आहे. ही बाब अतिशय गंभीर असताना काल परवा दिल्लीच्याच या कार्यक्रमात हजर राहिलेल्या व्यक्तींनी आपला परतीचा प्रवास आंध्रप्रदेशातील त्यांच्या गावाकडे म्हणजे कर्नुलकडे करत होते. परंतू त्यांच्या वाहनाचा चालक अचानक लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे या १२ प्रवाशांना सोडून गेल्याने या नागरिकांची गोची झाली. याच दरम्यान त्यांची स्थानिक पोलीसांकडून विचारना केली आणि संबधीतांना त्यांच्या प्रवासाची माहिती घेतल्या नंतर त्यांना लातूर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता त्यांच्या पैकी एकूण ८ जण कोरोनाने बाधीत असल्याचे लक्षात आले. यामुळे आजपर्यंत लातुरात एकही रुग्ण नसल्याचे समाधान कारक बाब असताना आत्ता मात्र लातूर शहरात भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतू या बाबतीत संबंधीत रुग्णांना सध्या कोरोनाच्या विशेष अशा अतिदक्षता विभागात दाखल करुन त्यांच्याकडून कसल्याचे प्रकारचे संक्रमण होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,हरियाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील फिरोजपुर झिरका येथे तीन महिन्यापासून धार्मिक कार्यासाठी गेलेले होते.ते परत निघताच देशभरात अचानकपणे लॉकडाऊन घोषित करण्यात आला.त्यामुळे त्यांना गावाकडे जाण्यासाठी रेल्वे साफडली नाही.तेव्हा त्यांना तहसिलदाराचे पत्र घेवुन खाजगी वाहनाने मथुरा, आग्रा, इंदोर धुळे, उस्मानाबाद तुळजापूर मार्गे हे १२ जण बुधवारी म्हणजेच १ एप्रिल रोजी निंग्यात पोहचले हे १२ जण गाडीच्या खाली उतरताच त्या वाहनचालकांने निलंग्यातून लगेच पळ काढल्याचे समझते.दरम्याण ते १२ जण निलंग्यातील एका महशीदीत मुकामाला थांबले होते.परवा सदरील माहिती जिल्हा प्रशासनाला कळताच प्रशासनाने या बारा जणाना ताब्यात घेवून काल त्या सर्वांना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल करून त्यांचे स्लॅब घेवून तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते.त्यांचे अवहाल आज शनिवारी प्रशासनाला प्राप्त होताच त्यातील आठ जणाला कोरोनाची लागण झाल्याची निरूष्पण झाले.आहे.तबल आठ जणाना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाल्याने लातूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.निलंग्यात त्या महशीदीत हे १२ जण थांबले होते त्या मशीदीच्या परिसरातील आणि दरम्याच्या काळात त्यांच्या संपर्कात किती जण आले यांची विचारपूस प्रशासन करत असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या तपासण्या करण्यात येणार असल्याने प्रशासनाने सांगितले आहे.