उदगीर / बस्वराज बिराजदार :
कोरोना आजारा संदर्भात लातूर जिल्हा ग्रीन झोन मध्ये असताना आज दुपारी उदगीर शहरातील एका महिलेचा स्वॅब पाझिटिव्ह आला आणि सायंकाळी तिचा मृत्यू झाला. लातूर जिल्हातील कोरोना चा हा पहिला बळी आहे.मरण पावलेली व्यक्ती हि ७० वर्ष वयाची महिला आहे.चार दिवसापुर्वीच ती बाहेर राज्यातून आल्याचे सांगण्यात येते.कोरोनाने मृत्यू पावलेल्याचे शवविच्छेदन केले जात नाही. ती महिला मुलापासून स्वतंञ राहते असेही कळते.प्रशासन सर्व ती खबरदारी घेऊन अंत्यसंस्कार करतील अशी शक्यता आहे.
लातूरमध्ये यापूर्वी ८ परप्रांतीय हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. १४ दिवसांच्या उपचारानंतर या सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आले होते. त्यामुळे लातूर जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, शनिवारी उदगीर शहरातील एका ६५ वर्षीय महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने ती रुग्णालयात दाखल झाली. तिला कोरोना सारखी लक्षणे आढळून आल्याने तिची तपासणी करून अहवाल पाठवला. सदरील अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उदगीर शहर हादरले आहे. त्या महिलेवर उपचार चालू असतानाच तिचा मृत्यू झाल्याने उदगीर शहरात खळबळ माजली आहे. आपल्या मुलाला गुजरात येथे जाऊन भेटून आल्यानंतर सदरील महिला आपल्या चौबारा परिसरातील घरी राहत होती. तसेच तिचा एक मुलगा गुजरातला तर दुसरा मुलगा उदगीर येथील किल्ला गल्ली भागात राहतो. सदरील महिलेचा मृत्यू होताच, उदगीर नगरपालिकेच्या वतीने तिसर्यांदा पुन्हा किल्ला गल्ली, चौबारा परिसर हायड्रोक्लोरोक्वीनने फवारणी चालू आहे. अशी माहिती उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी दिली आहे. सदरील महिला ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आली आहे, त्यांनी माहिती प्रशासनाला कळवावी. असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान त्या महिलेचा मुलगा, पती आणि मुलगी यांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. उदगीरच्या नागरिकांनी घाबरून जावू नये, मात्र अनावश्यक बाहेर फिरू नये.प्रशासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे असेही आवाहन मुख्याधिकारी राठोड यांनी केले आहे. ही महिला कोणाच्या संपर्कात आली होती. तिला कोरोनाची लागण नेमकी कधी झाली. यासारखे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. जिल्हाबंदी आदेशाची पायमल्ली होत आहे काय? असा सवालही निर्माण होऊ लागला आहे.उदगीर येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना घडली. आज (शनिवार) महिलेचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. अहवाल आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे उदगीरमध्ये खळबळ उडाली आहे.