लातूर /प्रतिनिधी ः कोरोना महामारीच्या संकटाने देशात थैमान घातलेले असताना देशात प्रत्येक स्तरावर कार्यरत राहून आम जनतेला संक्रमणापासून वाचवण्यार्या कोरोना वॉरिअर्सला सरकार आणि समाजातील अन्य घटकांनी भरघोस मदत केली. सरकारने ही अशा घटकांच्या कामाच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात सढळ हाताने वाढ केली. परंतू यासर्व कोरोना वॉरिअर्सच्या खांद्याला खांदा लावून, प्रसंगी त्यांच्यापेक्षा पुढे राहून आपले कर्तव्य बजावणार्या कोरोना वॉरिअर्स म्हणवले गेलेल्या पत्रकारांना मात्र सर्वानी उपाशिच ठेवल्याचे चित्र देशात सर्वत्र दिसत आहे.
जागतिक स्तरावर हाहाकार माजवणार्या चायनिज कोरोना रोगाच्या संक्रमणापासून समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला वाचवण्यासाठी आप आपल्या परीने आप आपल्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना कोरोना वॉरिअर्स म्हणजे कोरोना योध्दा म्हणवलं गेलं होतं. त्यांना या काळात देवाच्या समान दर्जा देऊन त्यांच्याशी सन्माने वागण्याचे आणि विशेष दर्जा देण्याचे फर्मान देखील सरकारने शासकीय यंत्रणांना बजावले होते. त्यानुसार कोरोना रुग्णांना वाचविणारे , किंवा कोरोना संक्रमणाला रोकण्याकार्मी विविध उपाययोजना करणारे अरोग्य कर्मचारी असतील, स्वच्छता कर्मचारी असतील किंवा रस्त्यावर अतिऊत्साही लोकांना येण्यापासून रोकण्याचे काम करत समाजात शांतता आणि बंदोबस्त करणारे पोलीस असोत की, आरोग्य कर्मचार्यांच्या बरोबरीनेच समाजातील विविध ठिकाणी असलेली अस्वच्छता दूर करुन समाजातील वातावरण निर्मळ ठेऊन कोरोनाला मज्जाव घालण्याचे तत्परतेने कार्य करणारे स्वच्छता कर्मचारी असोत यांना सरकारने, सामाजिक संस्था, नेतेमंडळी, सेवाभावी संस्था यांनी भरघोस मदत केली.
वरील कोरोना वॉरिसर्अच्या कामाचे कौतुक करत करत त्यांच्या कुटूंबीयांना त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि
शास्वती लाभावी यासाठी लाखो रुपयांचा विमा असो की, अन्य आर्थीक स्वरुपाच्या मदती असोत वा शाब्दीक स्वरुपात केलेले त्यांचे सांत्वन असेल यातून त्यांचा उत्साह वाढवला आणि ते योग्य नाही तर भविष्यात त्यांची त्यांच्या त्या कार्यातील ऋची वाढविणे किंवा त्यांना त्यांच्या कामाबद्दल प्रोत्साहन मिळण्यासाठी योग्यच होते. परंतू हे सर्व करत वरील सर्व प्रकारच्या घटकांना म्हणजे कोरोनावॉरिअर्सला सहानुभूती, आर्थिक सहकार्य वा सन्मान देण्याचे कार्य करणार्या सरकार, सेवाभावी संस्था, नेतेमंडळी आणि व्यक्ती यांना मात्र यांच्या बरोबरीने आपल्या जिवाची पर्वा न करता कॅमेरा हातात घेऊन धावपळ करणारा, हातात लेखनी घेऊन आपल्या परिसरातील कोरोना बाधीतांचा अहवाल आणि त्यांच्या आवस्था जाणून घेऊन त्या बाबतचं गांभिर्य समाजात पोहचवण्याचं काम करणार्या पत्रकारांच्या बाबतीत मात्र सापत्नक वागणूक दिल्याचं पहावयास मिळत आहे.
कारण कोरोना वॉरिअर्सच्या खांद्याला खांदा लाऊन काम करणार्या पत्रकारांना कोणत्याच प्रकारचे शासकीय लाभ, शासकीय योजनेअंतर्गत विमा संरक्षण किंवा कोणत्याही सामाजिक व सेवाभावी संस्थेची देणगी व मानधन किंवा अन्य स्वरुपातील कोणते सहकार्य लाभलेले नसल्याने पत्रकारांच्या बाबतीत मात्र सर्वजण केवळ आपली प्रसिध्दी करुन घेण्यापुरताच उपयोग करुन घेतात असा भास होतोय हे मात्र नक्की.
एरवी कोणत्याही निवडणूका आल्या की, स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या पक्षाबद्दल वास्तव, अवास्तव गोष्टी प्रसिध्द करुन घेणारी राज्यकर्ते, पुढारी आणि नेते यांचे मात्र यावेळी पत्रकारांकडे सपशेल दूर्लक्ष असल्याचे दिसून आले.
- मान्यताप्राप्त वृत्तपत्र व्यवसाय ऑनलाईन युट्युब चॅयनलमुळे ऑफ लाईनच्या मार्गावर
कुठल्याही प्रकारची मान्यता, किंवा कोणत्याही प्रकारची विश्वासाहार्य वृत्त प्रसारणाच्या मानांकनाची हमी नसलेल्या हजारो युट्यूब चॅयनलमुळे वृत्तपत्र व्यवसाय खर्चीक आणि ऑफलाईन होण्याच्या मार्गावर आहे. तशातच नव्या सरकारी धोरणांनी डबघाईला आलेला वृत्तपत्र हा व्यवसाय ऑनलाईनच्या जमान्यात ऑफलाईन होण्याच्या मार्गावर आहे. त्याशिवाय कोणत्याही अनुभवाशिवाय, कुठलीही शैक्षणिक अहृता नसलेल्या अर्ध्या हाळकुंडाने पिवळे झालेल्या पत्रकारांच्या घाणेरड्या अर्धवट पत्रकारितेमुळे हाडाच्या निष्ठावान आणि गुणवंत पत्रकारांनाही ठिल्लरपणाच्या पंक्तीत बसण्याची वेळ आलेली असल्याचे अनेकवेळा अनुभव आलेले आहेत. तशातच विविध राजकिय पक्षांचे छत्र लाभलेल्या अशा युट्युब चॅयनलवाल्या पत्रकारांकरवी कुशल, आणि गुणवत्ताधारक लेखणीला धार असलेल्या पत्रकारांना मात्र पत्रकारिता व्यवसायाचा तिटकारा येऊन केवळ कॉपी पेस्ट करणार्या पत्रकारांच्या कारस्तानापुढे आपले गुढगे टेकण्याची वेळ आल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे अशा अनियंत्रीत बिन व्हटाळीच्या बेरकी पत्रकारांना आळा घालून अनेक दिवसांपासून मान्यता घेऊन वृत्तपत्र चालवणार्या पत्रकार व संपादकांना सरकारने
कोरोना वॉरिअर्स गृहित धरलय तर त्या इतर कोरोना वॉरिअर्स प्रमाणे अनुदान, मानधान वा अन्य प्रकारचे सहकार्य करुन सद्यः परिस्थितीतून सावरण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा लातूर मराठी पत्रकार संघाकडून व्यक्त करण्यात येते आहे.