लातूर / प्रतिनिधी :-
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 63 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 09 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले असून व 10 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
दिनांक 09.07.2020 रोजी 43 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 14व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 16 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील एकूण 07 व्यक्तींची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली