गंगाखेड तालुक्यात सात दिवस संचारबंदी
परभणी/ राहुल गायकवाड :-
केवळ अत्यावश्यक सेवा वगळता शहरी ग्रामीण भागात संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये तब्बल तीन दिवस कडकडीत बंद राहणार असून यासंदर्भातील संचार बंदीचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जारी केले आहेत गंगाखेड तालुका आणि परिसरात मात्र सात दिवस कडकडीत बंदअसून या भागातील सर्व व्यवहार बंद आहेत .परभणी जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढते आहे ही चिंताजनक परिस्थिती निर्माण होते की काय अशी शंका येत असताना परभणी जिल्हाअधिकारी अधिकारी यांनी पुन्हा एकदा परभणी जिल्हा लाक डाऊन केले असून काही दिवस संचारबंदी आदेश जारी केले आहे त्याचप्रमाणे गंगाखेड शहर व परिसरातील संपूर्ण आठ दिवस कडकडीत संचारबंदी आदेश दिले असून नागरिकांनी कोणी रस्त्यावर बाहेर पडू नये असे आवाहन नागरिकांना करण्यात आलेले आहे परभणी जिल्ह्यातील नागरी भागात आणि लगेच तीन किलोमीटर अंतरापर्यंत रविवारी मध्यरात्री पर्यंत संचारबंदी जारी करण्यात आले होते. परंतु रुग्णांची संख्या लक्षात घेता आणखीन तीन दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार या तीनही दिवशी या भागातील संपूर्ण व्यवहार बंद असतील तेवढेच तर अत्यावश्यक कामानिमित्य बाहेर येऊ नये . नागरिकांनी व कोणी घराच्या बाहेर येऊ नये असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .