पेठवडज येथे आरोग्यरत्न डाॅ. रणजित काळे यांच्या वतीने १००० कुटुंबांना अर्सेनिक अल्बम-३० गोळ्याचे वाटप


मुखेड / संदिप पिल्लेवाड :- शहरात मागील पाच वर्षापासुन जित हाॅस्पीटलच्या माध्यमातुन २४ तास सेवा देणारे आरोग्यरत्न डाॅ. रणजित काळे यांनी कोरोना काळात आपले रुग्णालय २४ तास चालू ठेऊन तालुक्यातील नागरिकांना सेवा देत आहेत. त्याबरोबरच समाजसेवेची आवड असल्याने मे महिन्यात शहरातील कोरोना काळात काम करणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांना डॉक्टर काळे यांच्यावतीने आर्सेनिक एल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. व दिनांक १२ जुलै रोजी कंधार तालुक्यातील पेठवडज येथे १००० कुटुंबीयांना त्यांच्या वतीने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम-३० या गोळ्याचे वाटप करण्यात आले.


       आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला नागरिकांना दिल्याने ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने या गोळ्यांचे वाटप संस्था आणि राजकारण्यांकडून केले जात आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पेटवडज जिल्हा परिषद गटात मुखेड तालुका एनएसयूआय तालुका कार्याध्यक्ष आरोग्य रत्न डॉ. रंजीत काळे यांच्या सोबत विश्वजीत काळे, राजू काळे,अविनाश देशमुख, मारुती जहिरे यांच्यावतीने पेठवडज येथील काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते यांच्या विनंतीवरून दिनांक १२ जुलै रोजी पेठवडज येथे १००० कुटुंब म्हणजेच ५००० नागरिकांना आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल पेटवडज गटात डॉक्टर काळे यांचे कौतुक होत आहे.


          या कार्यक्रमाचे आयोजन देविदास कारभारी, चंद्रकांत देशमुख, डॉक्टर शिवाजी नाकाडे, राहुल राजे, सत्यपाल पुटवाड यांनी केले होते तर या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्ते दिगंबर तेरवाड, प्रकाश कंधारे, नामदेव डावकोरे, गुरुनाथ गायकवाड, राम चिटकुलवार, नयुम शेख, आनंद दामले, पप्पू दामले, संभाजी गोंधळे, परमेश्वर पुटवाड, व्यंकटराव शेठवाड, परमेश्वर जोगदंड, गजानन हराळे, रमेश पांढरे, व पेटवडज काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते


 



  1. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन आयुष मंत्रालय भारत सरकार मान्यताप्राप्त आर्सेनिक अल्बम ३० या होमीओपॅथीक औषधीचे तीन डोस सकाळी उपाशी पोटी (एक डोस ६ गोळ्या) घ्यावयाच्या आहेत. पथ्य म्हणुन कच्या कांदा, कच्चा लसुण, लिंबु आणि चहा काॅफी हे तीन दिवसाचा डोस होईपर्यंत घ्यायचे नाही. याच्या परिणामी एक महीना रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही.

  2.  - आरोग्यरत्न डाॅ. रणजित काळे