पालम शहराला अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पासूनच भीती

पालम/गोविंद सोलेवाड : पालम तालुका हा परभणी जिल्ह्यातील सर्वात सुरक्षित व कोरोना मुक्त शहर तालुका म्हणून नावा रूपास जरी येत असला तरी या शहरांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी हे स्थानिक पातळीवर वास्तव्यास नाहीत त्यामुळे त्यांना दररोज आपल्या कामकाजासाठी कार्यालयीन ठिकाणी येण्यासारखा बाहेर जिल्ह्यातून बाहेर तालुक्यातून यावे लागत आहे त्यामध्ये प्रामुख्याने जनसंपर्क असलेल्या महसूल विभागाचे तहसील कार्यालय पंचायत समिती विभाग तालुका कृषी कार्यालय यासह आधी शासकीय कार्यालयातील कर्मचारी हे अपडाऊन करत आहेत त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या वतीने व नगरपंचायत विभागाने घेतलेले सर्व मेहनत व त्या मेहनतीचे फळ हे अपडाऊन करणारे अधिकारी व कर्मचारी वाया घालवतात की काय असे भीती तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना मुख्यालय राहण्याच्या सूचना परिपत्रकाच्या माध्यमातून दिलेल्या असल्या तरीही महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार पायमल्ली करत 99 टक्के कर्मचारी अधिकारी हे बाहेर जिल्ह्यामध्ये बाहेर तालुक्यात वास्तव्याला आहेत या विषयावर प्रत्येक विभागाचे विभाग प्रमुख हे कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेत कारवाई करत नाहीत त्याला कारणही तसेच आहे ते म्हणजे सर्व कार्यालयातील कार्यालय प्रमुख हे स्थानिक लेवलला रहात नाहीत त्यामुळे तेथे दुसऱ्या कर्मचाऱ्यांवर मुख्यालयी राहण्याची सक्ती कशी करतील अशी सक्ती न करता या सर्व कार्यालयातील कार्यालय प्रमुखाची भूमिका म्हणजेच *तेरी भी चूप और मेरी भी चुप* अशी असल्याचे दिसून येत आहे त्याकरिता सर्वात विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींची दखल घेऊन मुख्यालय ठिकाणी राहत नसलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा पालम शहर व तालुका हा हॉटस्पॉट बनल्याशिवाय राहणार नाही तसेच ज्या पद्धतीने आजपर्यंत पालम शहर व तालुका कोरोना मुक्त राहिलेला आहे त्याच पध्दतीने या पुढेही आजपर्यंत पोलीस प्रशासनाने व नगरपंचायत विभागाने राखलेली सुरक्षितता अबाधित राहायला हवी असे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलल्या जात आहे