लोहा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारानी दिले कोविड सेंटर साठी 100 बेड.
लोहा /प्रतिनिधी :- जगाला भिंती निर्माण करणार्या करोणा या रोगामुळे मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आता त्यानें ग्रामीण भागामध्ये सुध्या अहंकार माजवला आहे. मोठया प्रमाणात रुग्णांना उपचारासाठी खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात बेड सारख्या सुवीधा कमी पडत आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी बेहाल होताना दिसत आहे.

 

लोहा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय रुग्णालयात काही मुलभूत सुविधा उपलब्ध नव्हते असणार्या सुवीधाचा ‌ दिलासा मिळणार कसा शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध नाहीत ही माहिती जेव्हा लोहा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना कळली तेव्हा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन 2लाख 40हजारूपायची १६६ दुकानदारांनी वर्गणी करून 100 बेड ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिले तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राम बोरगावकर पुरवठा विभागाचे पेशकार गणेश मोहिजे यांच्या माध्यमातून हा आगळावेगळा उपक्रमआखला आणि तब्बल शंभर बेड उपलब्ध करून दिले त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळत आहे या उपक्रमामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी एक सामाजिक दायित्व म्हणून स्वस्त धान्य दुकानदार समाजाच्या हितासाठी पुढे आले त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होते.

 

 या बाबींमुळे सध्यातरी लोहा तालुक्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे रुग्ण संख्या वाढली तरीही आता सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे या महामारी काळात मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालयांमध्ये बेड नाहीत पण शासकीय रुग्णालयांमध्ये चांगल्या सुविधा योग्य जेवण योग्य तपासणी केली जात असल्यामुळे रुग्णांमध्ये सध्यातरी चांगले वातावरण झाले आहे मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होताना दिसत आहे.पण नागरीकांनी सुध्दा करोणा रोगांपासून काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे त्यासाठी नागरीकांनी शासनाने नियम घालून दिले त्याचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.

 

  या उपक्रमाबद्दल तहसीलदारांनी सर्व 166 दुकानदारांचा कौतुक व अभिनंदन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आगामी काळात या संकटावर मात करण्यासाठी इतर संघटनेने सुद्धा पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे आणि या रुग्णालयांमध्ये सुविधा नाही त्या सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार त्यामध्ये संघटनेचे अध्यक्ष कानवडे ,अन्वर शेख ,सुभाष पवार, महेंद्र लाभसेटवार प्रदीप पेनुरकर,रमेशसिंह शंकरसिंह चौव्हान लोहा तालुक्यातील कोविड झालेल्या व्यक्तीला बेड कमी पडु नये व बेड न मिळाल्याने त्यांची मृत्यू होवू नये म्हणून आदींनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.