धक्कादायक| जवायाने केला सासऱ्याचा खून..,आरोपींना शनिवार पर्यंत पोलीस कोठडी
देगलूर / प्रतिनिधी :- पत्नीला सासरी नांदवायस पाठवत नसल्याच्या कारणावरून सासऱ्याचा खून केल्याची घटना देगलूर तालुक्यातील मानूर येथे दिनांक १६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

     मानूर येथील रमेश पांढरे यांची मुलगी सुरेखा हिचे लग्न दहा वर्षांपूर्वी बेम्बरा येथील उमाकांत सोलंकरशी झाला होता. मात्र लग्नापासून सुरेखाला सासरी सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. सततच्या या त्रासाला कंटाळून रमेश पांढरे यांनी मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आल्यानंतर मागील अकरा महिन्यापासून सासरी पाठवले नव्हते.

      दिनांक १६ सप्टेंबर रोजी उमाकांत सोलंकर व त्याचे वडील मुरलीधर सोलंकर यांनी सुरेखाच्या माहेरी जाऊन तिला सासरी पाठवण्याची विनंती केली असता रमेश पांढरे यांनी आमावस्या झाल्यानंतर पाठवतो असे सांगितले. मात्र उमाकांत हा त्याच्या पत्नीस आत्ताच घेऊन जायचे असे सांगत वाद घालून शिवीगाळ करीत असताना त्याच्यात वाद झाला. त्यावेळी उमाकांत व त्याचे वडिल मुरलीधर सोलंकर यांनी रमेश पांढरे यांना छातीवर लाथा, बुक्क्याने व अंगणातील विटाने मारहाण केली. त्यात ते बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी हणेगाव येथील आरोग्य केंद्रात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत रमेश पांढरे यांचे शवविच्छेदन केल्यानंतर मयताची पत्नी चंद्रकलाबाई रमेश पांढरे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही आरोपींना लगेच अटक करण्यात आले तर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून मरखेल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहोत...