नायगाव /प्रतिनिधी :- येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील किर्ती गोल्ड कंपनीत गेली विस वर्षांपासून काम करीत असलेल्या जयवंता शंकरराव लंगोटे या कुष्णूर येथील रहिवाशास कंपनीच्या व्यवस्थापकाकडून जिवे मारण्याची धमकी येत असल्यामुळेच लंगोटे यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .
येथील किर्ती गोल्ड कंपनी नेहमीच विविध कारणाने चर्चेत राहीली आहे .अनेक वेळेस येथील कामगारांनी उपोषण केलेली आहेत .गेली दोन दशकापासून कंपनीत काम करीत असलेल्या जयवंता लंगोटे रा.कुष्णूर या कामगारास कंपनीतून कामावरून कमी करून व्यवस्थापक औदुंबर शिंदे , महेश भुजबळ व कंपनीच्या मालकाचे ड्रायव्हर वाघमारे यांनी गावातील गावगुंडाना हाताशी धरून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार लंगोटे यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे .कसलीही चूक नसताना कामावरून कमी केल्यामुळे कुटूंबावर उपासमारीची वेळ आल्यामुळेच कंपनीच्या गेट समोर अमोरण उपोषणास बसणार असल्याचेही लंगोटे यांनी सांगीतले असून यापूर्वी दत्तात्रय जाधव यांना दूषित पाण्याच्या संदर्भात तक्रार केल्यावरून मारहाण झालेल्या वरून दत्तात्रय जाधव यांनी कीर्ती गोल्ड सुद्धा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती