देगलूर पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा
देगलूर/ प्रतिनिधी :- देगलूर पोलिसांनी एका चारचाकी वाहनाला पकडून त्यात असलेला ३ लाख ८५ हजार ८६० रुपयांचा गुटखा आणि २ लाखाच्या किंमतीची गाडी असे साहित्य पकडले आहे. या गाडीच्या चालकाला देगलूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बरडे यांनी पोलीस कोठडीत पाठविले आहे.देगलूर येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण शेषराव कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.१७ सप्टेंबरच्या मध्यरात्री २:३०. वाजेच्या सुमारास देगलूर कॉलेजसमोर पोलीस उपनिरिक्षक जनाबाई सांगळे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नारायण कांबळे, पोलीस कर्मचारी यमलवाड यांनी चारचाकी वाहन क्र.एमएच-२६-एच-२६१० ला थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा हा पदार्थ होता.या गाडीमध्ये जवळपास ३ लाख ८५ हजार ८६० रुपयांचा विविध कंपन्यांचा मिळून आला. या दरम्यान जप्त केलेली गाडी दोन लाख रुपयांचे असे साहित्य जप्त करुन देगलूर पोलिसांनी गाडी चालक प्रकाश अर्जुन कांबळे (३५)यास अटक केली. नारायण कांबळे यांच्या तक्रारीवरुन देगलूर पोलिसांनी गुन्हा क्र.३९२/२०२० दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जनाबाई सांगळे करीत आहेत. देगलूर न्यायालयाने गुटका गाडीचा चालक प्रकाश कांबळेला पोलीस कोठडीत पाठविले आहे.